शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक महामार्गावरील खेड घाटात १५० फुट खोल दरीत कार कोसळली; चालकाचं ताबा सुटल्याने घडला हा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 12:48 IST

खेड पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे चालक बचावला

ठळक मुद्देपोलिसांनी चारचाकी गाडीच्या काचा फोडून जखमी अवस्थेत असणाऱ्या खैरनार यांना काढलं बाहेर

राजगुरुनगर : पुणे - नाशिक महामार्गावर खेड घाटात एक चारचाकी गाडीचा बिघाड होऊन चालकाचा ताबा सुटल्यामुळे सुमारे १५० फुट दरीत कोसळली.  सुदैवाने खेडपोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे चालक बचावला आहे. (संजय मधुकर खैरनार, वय ४९ रा. नाशिकरोड नाशिक) असं चालकाचं नाव आहे. ही घटना १४ तारखेला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

खैरनार हे नाशिकवरून पुण्याला नातेवाईकाकडे जात होते. पुणे -नाशिक महामार्गावर नवीन बाह्यवळण खेड घाटात आल्यानंतर अचानक चारचाकी कारचा बिघाड झाला. घाटात गाडी थांबवून खैरनार यांनी गाडीची पाहणी केली. पुन्हा गाडी सुरू केली असता अचानक गाडीचा वेग वाढला व गाडी थेट १५० फुट दरीत गेली. दरम्यान एका व्यक्तीने खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलीस अंमलदार स्वप्नील गाढवे आणि त्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दरीत उतरुन चारचाकी गाडीच्या काचा फोडून जखमी अवस्थेत असणाऱ्या खैरनार यांना बाहेर काढले. खेड घाटातील बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी सरंक्षक कठडे नाही. खैरनार याची गाडी दरीत कोसळली झाडे झुडपांत गाडी अडकल्याने व पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून गेल्यामुळे चालक खैरनार यांचा जीव वाचला आहे.

टॅग्स :KhedखेडAccidentअपघातPoliceपोलिसcarकार