डिव्हायडरला धडकून कारचा अपघात, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:57+5:302021-06-05T04:07:57+5:30
पुणे : रस्त्यावर पडलेला एक दगड चुकवण्याच्या नादात कारची डिव्हायडयरला धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटली. या ...

डिव्हायडरला धडकून कारचा अपघात, चालकाचा मृत्यू
पुणे : रस्त्यावर पडलेला एक दगड चुकवण्याच्या नादात कारची डिव्हायडयरला धडक बसल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार पलटली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. २) बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपासमोर रात्री आठ वाजता घडली.
गणेश सोमेश्वर घनचक्कर (वय २५) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे, तर साहिल मधुकर कुलकर्णी आणि सचिन सतीश जाधव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक वानवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरच्या रस्त्याने तिघे जण रात्री आठच्या सुमारास कारमध्ये बसून चालले होते. मयत गणेश हा कार चालवत होता. त्याची गाडी बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपाजवळ आली. तेव्हा रस्त्याच्या मध्ये एक दगड पडल्यामुळे दगडाला चुकवण्याच्या नादात डिव्हायडरला धडकून नियंत्रण सुटले आणि कार उलटली. यामध्ये गंभीर झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव पुढील तपास करीत आहेत.
-----------------------------------