कार-दुचाकीची धडक; १ ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:42+5:302021-09-06T04:15:42+5:30
दुचाकीस्वार प्रसाद राजेंद्र भोसले (वय २२, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर चारचाकीतील ...

कार-दुचाकीची धडक; १ ठार, पाच जखमी
दुचाकीस्वार प्रसाद राजेंद्र भोसले (वय २२, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. तर चारचाकीतील रविराज ज्ञानेश्वर मोरे (वय २२, रा सिद्धिविनायक कॉलनी, घुलेवस्ती रोड, मांजरी पुणे), राहुल कुवरसिंग ठाकूर (वय २३, रा. साडेसतरानळी, हडपसर), ओमकार सुखदेव राखपसरे (वय २२, रा. महादेवनगर, मांजरी रोड पुणे) व मयूर उजगिरे (वय १८) हे जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघात शनिवारी (दि. ४) रात्री ११.४५ च्या सुमारास झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमधून चार जण लोणी काळभोर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण आटोपून ते पुन्हा सोलापूर-पुणे महामार्गावरून घरी परतत असताना ते कवडीपाट टोलनाक्याचे अलीकडे अमृतबागच्या समोर आले असता त्यांचे समोर दुचाकीवरून प्रसाद भोसले हे जात होते. त्यांची कार भरधाव वेगाने असल्याने मोरे यांनी त्यांची कार आहे त्या स्थितीत डाव्या बाजूला वळवली. कार जागेवर गोल फिरून कारची मागची बाजू दुचाकीला धडकली. यात दुचाकीस्वार भोसले हे गंभीर जखमी होऊन महामार्गावर पडले. त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. कारमधील रविराज यांच्या डाव्या बाजूचा खुबा सरकला असून, ओमकार यांचे कपाळावर जखम झाली आहे. आनंदा माळी, राहुल ठाकुर, मयूर उजगिरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.