शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘द कॅप्टिव्हिटी’ झळकला युरोप आंतरराष्ट्रीय महोत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 18:44 IST

राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात आले आहे.

ठळक मुद्देपुण्यातील तरुणाची भरारी : माध्यमांच्या सद्यस्थितीवर परखड भाष्यया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ९२ देशांतून ९०० लघुपटांनी घेतला सहभाग ७२० पैकी सहा उत्कृष्ट लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड

पुणे : लोकशाहीचा प्रभावी आधारस्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेची अलीकडच्या काळातील अवस्था, राजकारणी किंवा गुन्हेगार लोकांनी ताकदीच्या जोरावर हिरावून घेतलेले पत्रकारितेचे स्वातंत्र्य हे वास्तव लघुपटाच्या माध्यमातून प्रखरतेने दाखवण्यात पुण्यातील किशोर लोंढे या युवा दिग्दर्शकाला यश आले आहे. किशोर लोंढे याने दिग्दर्शित केलेल्या आजच्या पत्रकारितेवर आधारित द कॅप्टिव्हिटी या लघुपटाने लाईफ सेफ्टी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये द बेस्ट शॉर्टफिल्म विभागामध्ये प्रथम पारितोषिक पटकावले. हा महोत्सव युरोपातील प्रिश्टिना कोसोवा येथे आयोजित करण्यात आला होताा.या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ९२ देशांतून ९०० लघुपटांनी सहभाग घेतला होता. त्यातील ७२० पैकी सहा उत्कृष्ट लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात द कॅप्टिव्हिटी या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. या एक मिनिटाच्या लघुपटामध्ये पत्रकारितेचे वास्तव, तसेच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. आत्तापर्यंत युरोप, अमेरिका, इटली, रशिया, आफ्रिका इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये हा लघुपट दाखण्यात आला असून ब-याच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये या लघुपटाने अंतिम फेरी गाठली आहे. ‘द कॅप्टिव्हिटी’ या लघुपटाचे चित्रीकरण प्रीतेश गावंडे यांनी केले असून निर्मिती अविनाश लोंढे यांनी केली आहे. किशोर लोंढे मूळचा वेणेगाव (ता. माढा) येथील आहे. एमबीए पदवीधर असूनही त्याने आपली चित्रपट निर्मितीची आवड जोपासण्याचा निर्णय घेत दिग्दर्शनात यश मिळविले आहे. याआधी किशोरचा आझाद हा लघुपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे लघुपटातून सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न किशोर आणि त्याचे सहकारी करत आहेत. त्यांनी आजवर आझाद, जन्मजात अशा लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. प्रिश्टिना कोसोवा येथे प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तसेच प्रथम पुरस्कार मिळाल्यामुळे खूप आनंदी आणि समाधानी असल्याचे मत किशोर लोंढे याने लोकमत शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाEnglandइंग्लंड