शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकावर ‘कॅप्टन अर्जुन’ची असणार गस्त; प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचेही करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 21:01 IST

कोरोनासह प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या रोबोटची खुप मदत होणार

ठळक मुद्देऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून हा रोबोट प्रवाशांशी संवादही साधणार

पुणे : रेल्वे स्थानकावर अचानक गर्दी, धावपळ सुरू झाली तर सुरक्षा यंत्रणेला कॅप्टन अर्जुन’ कडून तातडीने संदेश पाठविला जाणार आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचे कामही कॅप्टन करणार आहे. हा कॅप्टन एक रोबोट असून पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आला.

रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) संकल्पनेतून या रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डचे महासंचालक अरूण कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणु शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त अलोक बोहरा आणि विभागीय सुरक्षा आयुक्त अरूण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पध्दतीने रोबोटचे लोकार्पण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये या रोबोटमुळे महत्वाची भर पडली आहे. कोरोना संशयितांचा शोध घेणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा रोबोट महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.

कॅप्टन अर्जुनमध्ये फिरता सेन्सर, कॅमेरा तसेच एक डोम कॅमेरा आहे. या कॅमेरामध्ये कत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. कॅमेरापासून ५०० मीटर अंतरावरील संशयित हालचाली टिपता येणार आहेत. एकदा प्रवासी पळून जावू लागला, अचानक गोंधळ वाढला तर रोबोट कडून तातडीने नियंत्रण कक्षाला संदेश पाठविला जाईल. तसेच पळून जाणाºया व्यक्तीवर कॅमेरा केंद्रीत होऊन तो त्यादिशेने फिरत राहील. तसेच सायरनचा आवाज येऊ लागेल. रोबोटमध्ये थर्मल स्कॅनर असून त्यासमोर हात केल्यास ०.५ सेकंदात शरीराचे तापमान मोजले जाईल. निश्चित तापमानापेक्षा जास्त असल्यास लगेच अलार्म वाजेल. ऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून हा रोबोट प्रवाशांशी संवादही साधणार आहे. तसेच कोरोनावर जनजागृतीही केली जाणार आहे.------------सध्या एकच रोबोट असून तो पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ठेवला जाईल. तसेच प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वारावरही ठेवण्यात येणार आहे. कोरोनासह प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या रोबोटची खुप मदत होणार आहे.-  अरूण त्रिपाठी, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpassengerप्रवासी