टाकाऊ पॅन्ट्रीकार बनले कँटिन, कर्मचारी करू शकतील जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:10 IST2021-07-16T04:10:10+5:302021-07-16T04:10:10+5:30

पुणे : घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये जुनी व टाकाऊ झालेल्या पॅन्ट्रीकारमध्ये आता कर्मचारी जेवणाचा आनंद घेत आहेत. ...

The canteen became a waste pantrycar, staff could make meals | टाकाऊ पॅन्ट्रीकार बनले कँटिन, कर्मचारी करू शकतील जेवण

टाकाऊ पॅन्ट्रीकार बनले कँटिन, कर्मचारी करू शकतील जेवण

पुणे : घोरपडी येथील कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये जुनी व टाकाऊ झालेल्या पॅन्ट्रीकारमध्ये आता कर्मचारी जेवणाचा आनंद घेत आहेत. कारण यांत्रिक विभागाने त्या डब्याचे रूप पालटून त्याचे रुपांतर कर्मचाऱ्यांना जेवता यावे या करिता कॅन्टिनमध्ये केले आहे. मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता ए. के. गुप्ता यांच्या हस्ते व विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या उपस्थित डब्यातील कॅन्टिनचे उद्घाटन झाले. कर्मचाऱ्यांना येथे चहा, नाश्ता व जेवण करता येईल.

गुप्ता यांनी कोचिंग कॉम्प्लेक्समधील विविध कामांचे निरीक्षण करून त्याचा आढावा घेतला. तसेच नव्याने तयार होणाऱ्या ऑटोमेटिक कोच वाॅशिंग प्लांट व झेलम एक्स्प्रेसचे निरीक्षण केले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस सह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The canteen became a waste pantrycar, staff could make meals