ऊस ट्रॉली-कारची धडक; पोलीस अधिकाऱ्यासह एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:32+5:302021-02-20T04:30:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : बेदरकारपणे होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे पुणे-सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे पाहावयास मिळत ...

ऊस ट्रॉली-कारची धडक; पोलीस अधिकाऱ्यासह एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : बेदरकारपणे होत असलेल्या ऊस वाहतुकीमुळे पुणे-सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे पाहावयास मिळत असून, गेल्या आठवड्यात आईवडील आणि मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर मदनवाडी चौकातील उड्डाणपुलावर गुरुवारी झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्यासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत असणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात घडला. सूर्यकांत गायकवाड (वय ५५), विनोद दामोदर कोळी (वय ४०) अशी या अपघातात जीव गमावलेल्यांची नावे आहेत. गायकवाड हे मुंबई पोलीस दलात अधिकारी होते. तर नासीर शकूर मन्सुरी हे जखमी झाले. मदनवाडी पुलावर ऊसवाहतूक करणाऱ्या ट्राॅलीला कारची धडक होऊन हा अपघात घडला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात ऊसवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरविरोधात हलगर्जी आणि वाहतुकीचा नियम मोडून अविचाराने वाहन चालविल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जखमीवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.