उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:25+5:302021-01-13T04:25:25+5:30
अवसरी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती ...

उमेदवारांनी प्रशासनाला सहकार्य करावे
अवसरी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर,माजी सभापती आनंदराव शिंदे,पोलीस पाटील संतोष शिंदे,विद्या शिंदे,माजी सरपंच संगीता शदे ,माजी उपसरपंच दिनेश खेडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे म्हणाले आंबेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.उमेदवारांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे.अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.अवसरी खुर्द गावात सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून ११ जागांसाठी मतदान होणार आहे.अशी माहिती देण्यात आली आहे.
अवसरी खुर्द येथे ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे.
-------------------------------------