प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध
By Admin | Updated: February 5, 2017 03:44 IST2017-02-05T03:44:05+5:302017-02-05T03:44:05+5:30
टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी झालेल्या अर्ज छानणीवेळी काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांच्या

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध
पुणे : टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात शनिवारी झालेल्या अर्ज छानणीवेळी काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. एकुण १७५ अर्जांपैकी २५ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले.
अर्ज छाणनीसाठी निवडणुक कार्यालयामध्ये सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रभाग क्रमांक ३०, ३३ व ३४ च्या निवडणुक कार्यालयातून प्रत्येक प्रभाग व गटनिहाय छाननीची माहिती ध्वनिक्षेपकावरून देण्यात येत होती. त्यानुसार अर्जाची छाणनी होत होती. छाणनीवेळी विरोधी उमेदवारांनी जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. काही वेळाने झालेल्या सुनावणीवेळी दोघांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. काही उमेदवारांनी दोन ते चार अर्ज भरले होते. अपक्षासह विविध पक्षांच्या नावांवरही अर्ज भरण्यात आल्याने अर्जांची संख्या वाढली होती. तीनही प्रभागातून एकुण १५१ उमेदवारांनी १७५ अर्ज भरले होते. काहींनी दोन, चार अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली. छाणनीवेळी काही दुबार अर्ज रद्द करण्यात आले. तर अर्जात खाडाखोड, तीन अपत्य अशा विविध कारणांमुळे एकुण २४ उमेदवारांचे २५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. छानणीनंतर सर्वाधिक अर्ज प्रभाग ३० अ मध्ये २४ तर प्रभाग ३० ब मध्ये सर्वात कमी ६ अर्ज उरले आहेत.
इच्छुकांचा, कोणता झेंडा घेऊ हाती ?
विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधीपर्यंत अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले नव्हते. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता काही इच्छुकांनी अपक्षासह विविध पक्षांच्या नावाचे अर्जही भरले आहेत. एका महिला इच्छुकाने अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांचेही अर्ज भरले. तीनपैकी कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळविण्याची तयारी त्यांनी केली होती. तसेच पक्षांनी उमेदवारी नाकारल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचीही त्यांची तयारी होती. अखेरच्या क्षणी त्यांना एका पक्षाकडून उमेदवारी मिळाली. तर एका पुरुष उमेदवाराने शिवसेना, काँग्रेस आणि मनसे या तीनही पक्षांकडून अर्ज भरले होते. मात्र, त्यांना कोणत्याही पक्षाकडून अधिकृत
उमेदवारी मिळाली नाही.