शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पास दरवाढ रद्द करा, पीएमपी प्रवासी मंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:26 AM

ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासदरात करण्यात आलेली बेकायदा वाढ रद्द करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष

पुणे : ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व इतर बस पासदरात करण्यात आलेली बेकायदा वाढ रद्द करावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे करण्यात आली. गुंडे यांना नागरिकांच्या १५ हजार सह्यांचे निवेदन देण्यात आले.बसपास दरवाढीविरोधात मंचच्या वतीने शहरातील विविध बसस्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंचच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे मंचच्या वतीने शुक्रवारी गुंडे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, सचिव संजय शितोळे, सहसचिव सतीश चितळे, जयदीप साठे, नीलकंठ मांढरे, आमआदमी पक्षाचे किशोर मुजुमदार, एस. एम. अली, सतीश यादव या वेळी उपस्थित होते.बसपास दरवाढीनंतर पासधारकांची संख्या कमी झाली आहे. पुण्यातील पीएमपी व्यवस्था सक्षम होण्यासाठी माझा प्रयत्न असेल. पीएमपीची आताची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करून आणि प्रवाशांना केंद्रबिंदू ठेवून प्रवासी मंचाचे सहकार्य घेत एकत्रित काम करू, असे आश्वासन गुंडे यांनी दिल्याची माहिती मंचतर्फे देण्यात आली.