साखरेवरील सेस वाढ रद्द करा : हर्षवर्धन पाटील

By Admin | Updated: February 10, 2016 03:17 IST2016-02-10T03:17:49+5:302016-02-10T03:17:49+5:30

केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१६ पासून साखरेवरील असलेल्या सेसमध्ये एकदम १०० रुपयांनी वाढ केल्याने कारखानदारी अधिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी माजी

Cancel the increase on the sugar cess: Harshwardhan Patil | साखरेवरील सेस वाढ रद्द करा : हर्षवर्धन पाटील

साखरेवरील सेस वाढ रद्द करा : हर्षवर्धन पाटील

बावडा : केंद्र सरकारने १ फेब्रुवारी २०१६ पासून साखरेवरील असलेल्या सेसमध्ये एकदम १०० रुपयांनी वाढ केल्याने कारखानदारी अधिक संकटात सापडली आहे. त्यामुळे ही वाढ रद्द करण्याची मागणी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पूर्वी केवळ २४ रु. सेस होता. संसदेचे अधिवेशन दि. २३ पासून सुरू होत आहे . या अधिवेशनात राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी
एकजुटीने प्रयत्न करुन या मागणीस पाठिंबा देऊन वाढ केलेला
सेस रद्द करावा, अशी मागणी पाटील यांनी खासदारांशी संपर्क साधून केली आहे.
राज्य साखर कारखाना महासंघाचे शिष्टमंडळ या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री व अन्न पुरवठा मंत्र्यांना निवेदन देणार आहे. साखरेच्या दरात घसरण होऊन बाजारभाव १०० रुपयांनी घसरला. सध्या अबकारी करापोटी १ क्विंटल साखरेवरती ७१ रु. प्रतिक्विंंटल दर दिला जातो. त्यामुळे आता प्रतिक्विंटलला १९५ रु. कर द्यावा लागणार आहे. केंद्राच्या या चुकीच्या धोरणामुळे देशातील ५ कोटी व राज्यातील ३५ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे . (वार्ताहर)

Web Title: Cancel the increase on the sugar cess: Harshwardhan Patil