शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

मिलिंद एकबोटे यांचा जामीन रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:03 AM

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी या दंगलीतील पीडिताने नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.समता हिंदू आघाडीचे मुख्य मिलिंद एकबोटे यांच्यावर पुणे पोलिसांनी दोन एफआयआर नोंदविले आहेत. दंगल उसळविण्याचा व प्रिव्हेन्शन आॅफ अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी मार्च महिन्यात अटक केली. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर, एका महिन्यातच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.पुणे सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला या दंगलीतील पीडित संजय भालेराव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, एकबोटे यांच्यावर यापूर्वी १७ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत आणि ही बाब सत्र न्यायालयाने विचारात घेतलेली नाही. पोलीस तपासानंतर कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित होती, असे सिद्ध झाले आहे.एकबोटे हे समाजातील प्रभावशाली व्यक्ती असल्याने त्यांची जामिनावर सुटका केली, तर ते पुरावे नष्ट करण्याचा व साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती भालेराव यांनी न्यायालयाला केली आहे.सुनावणी ५ जूनला : उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीकालीन खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली. मात्र, न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ५ जून रोजी ठेवली.

टॅग्स :Milind Ekboteमिलिंद एकबोटे