‘एमआयएम’च्या संपर्कातील कार्यकर्ते बिहारच्या प्रचारात

By Admin | Updated: September 15, 2015 04:24 IST2015-09-15T04:24:01+5:302015-09-15T04:24:01+5:30

महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. एमआयएमच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल, अशी अपेक्षा बाळगलेले पिंपरी-चिंचवडमधील

Campaigners in connection with 'MIM' in Bihar | ‘एमआयएम’च्या संपर्कातील कार्यकर्ते बिहारच्या प्रचारात

‘एमआयएम’च्या संपर्कातील कार्यकर्ते बिहारच्या प्रचारात

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. एमआयएमच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरता येईल, अशी अपेक्षा बाळगलेले पिंपरी-चिंचवडमधील काही कार्यकर्ते नेत्यांच्या संपर्कात आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. पहिल्या टप्प्यात काही जण बिहारला रवाना झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने एमआयएमने हालचाली सुरू आहेत. दोन बैठका झाल्या. त्यात एमआयएममधून इच्छूक असलेल्यांची चाचपणी करण्यात आली. दीड वर्षाने महापालिका निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात निर्णय घेता येईल. आताच एमआयएममध्ये काम करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे नेत्यांच्या संपर्कात आलेले अनेकजण निवडणुकीपूर्वी पक्षाबरोबर काम करण्याची भूमिका उघडपणे जाहीर करण्यास धजावत नाहीत. एमआयएमबरोबर काम करण्याची तयारी आहे, हे दाखवून देण्यासाठी राज्याबाहेर बिहारच्या निवडणुकीत सक्रिय सहभागाची तयारी त्यांनी ठेवली आहे. (प्रतिनिधी)

-पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त बिहारमधून आलेला कामगारवर्ग मोठा आहे. भोसरी, चिंचवड एमआयडीसीत छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये काम करणारा हा कामगारवर्ग बिहार निवडणुकीतील मतदारही आहे.
-कुदळवाडी, तसेच नेहरूनगर, काळेवाडी येथील मुस्लीमबहुल परिसरातील बिहारच्या लोकांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. एमआयएमच्या माध्यमातून बिहारमध्ये प्रचाराचे काम करण्याची तयारी दर्शविलेल्यांना पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आले आहे.
-१२ आॅक्टोबरला बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होईल. त्यानुसार नियोजन करून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मूळ बिहारींना पुढील टप्प्यात मतदानासाठी नेले जाणार आहे. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ज्यांना पाठविले जाणार आहे, त्यांच्यावर येथून मतदारांना घेऊन जाण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
-बिहारमधील विशिष्ट मतदारसंघांवर एमआयएमने लक्ष केंद्रित केले असून, त्या दृष्टीने नियोजनद्ध पावले उचलली जात आहेत. या वृत्तास एमआयएमचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याने दुजोरा दिला आहे.

Web Title: Campaigners in connection with 'MIM' in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.