जंगली प्राण्यांना वाचवण्यासाठी वाल्हे येथे शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:27+5:302021-02-20T04:30:27+5:30

गेल्या वर्षी उसाच्या शेतात कोल्हा व जंगली मांजरांची अनाथ पिल्ले ऊसतोडणी कामगारांना सापडली होती. त्या पिल्लांना जखमी व ...

Camp at Walhe to save wildlife | जंगली प्राण्यांना वाचवण्यासाठी वाल्हे येथे शिबिर

जंगली प्राण्यांना वाचवण्यासाठी वाल्हे येथे शिबिर

गेल्या वर्षी उसाच्या शेतात कोल्हा व जंगली मांजरांची अनाथ पिल्ले ऊसतोडणी कामगारांना सापडली होती. त्या पिल्लांना जखमी व अनाथ वन्यप्राण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या पिंगोरी येथील इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर येथे नैसर्गिक अधिवासात मोठे करून योग्य वयाची झाल्यानंतर कोल्ह्याच्या पिल्लांना त्याच अधिवासात सोडण्यात आले होते. या वर्षी इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी कामगार यांच्या तळावर जाऊन त्यांना सर्पदंश टाळणे व सर्पदंश झाल्यावर काय करावे व काय करू नये, याबद्दल इला फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले. अनाथ वन्यप्राण्यांची पिल्ले मिळाल्यास वनविभाग किंवा संस्थेचे कार्यकर्ते यांना संपर्क करणे, मुलांकडून गलोरीने पक्षी मारणे व शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे, तसेच शिक्षेची असलेली तरतूद याविषयी राजकुमार पवार यांनी मार्गदर्शन केले.

इला फाउंडेशनच्या 'प्रकृती' ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांवर अल्पदरामध्ये उपचारासाठी विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. याविषयी पांडुरंग मदने यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आविष्कार भुजबळ यांनी केले, तर आभार शेतकरी तुषार भुजबळ यांनी मानले.

चौकट

गुळुंचे, मांडकी, माहूर, वीर, निरा, जेऊर आणि वाल्हे तसेच बारामती मधील १५ ऊसतोडणी कामगार तळावरीलमधील मुला आणि मुलींना २१० स्वेटरचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रदीप घोरपडे नीरा, धनंजय तावरे, पिंपरे नीरा बाळासो दरेकर, जावेदभाई सय्यद, राजुशेठ पेशवे, उमेशशेठ जगताप, प्रसन्ना शहा व राम शेठ (कावेरी कलेक्शन) जेजुरी यांनी १२० स्वेटर भेट दिले. तसेच ऊसतोडणी कामगार यांच्या मुलांसाठी केलेल्या कामासाठी आमचीही मदत व्हावी, या उद्देशाने योगेश्वर टकले, मोरगाव यांनी केलेल्या आवाहनाला संजय सावंत, अकलूज यांनी ९० स्वेटर दिले. केलेल्या कामाबद्दल त्यांनी आशा प्रकल्प व इला फाउंडेशन संस्थेचे कौतुक केले.

फोटो ओळ- वाल्हे (ता. पुरंदर) येथे वन्यप्राण्याची अनाथ पिल्ले वाचवण्यासाठी शिबिरामध्ये मार्गदर्शन करतेवेळी राजकुमार पवार.

वाल्हे येथील ऊसतोड कामगार यांच्या मुलांना स्वेटरवाटप करताना मान्यवर.

Web Title: Camp at Walhe to save wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.