दर्जेदार अभ्यासक्रमासाठी केंब्रिजचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:57+5:302021-09-02T04:24:57+5:30

पुणे : केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाने शिक्षक आणि शाळांसाठी व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

Cambridge program for quality courses | दर्जेदार अभ्यासक्रमासाठी केंब्रिजचा कार्यक्रम

दर्जेदार अभ्यासक्रमासाठी केंब्रिजचा कार्यक्रम

पुणे : केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाने शिक्षक आणि शाळांसाठी व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या ऑनलाईन अभ्यासक्रमात आठ विभागांत ४० तासांचे प्रशिक्षण असणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार याची आखणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची व्यस्तता, वर्तणूक व्यवस्थापन, मेटाकॉग्निशन, ॲॅक्टिव्ह लर्निंग, ब्लूमचे वर्गीकरण, एकाधिक बुद्धिमत्ता, भारतातील शैक्षणिक वर्गाच्या वातावरणात डिजिटल तंत्रज्ञानासह शिकण्यासाठी आणि शिकवण्याचे मूल्यांकन आदींचा यात समावेश असेल. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटच्या दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण राजमणी म्हणाले की, शिक्षण आणि शिक्षण तंत्रामधील अंतर कमी करण्यासाठी हा विकास कार्यक्रम विकसित केला आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख मनीष दोशी म्हणाले की, केंब्रिजने शाळांना उत्कृष्ट बनवण्यासाठी पीडी कोर्स तयार केला आहे.

Web Title: Cambridge program for quality courses