शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाईचा बर्थडे! तलवारीने केक कापणारी टोळकी वाढली; वाढदिवसाचा 'मुळशी पॅटर्न' ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:47 IST

‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.

भिगवण : ‘भाई का बड्डे वाजले बारा’ असे म्हणत मित्रपरिवाराचे वाढदिवस थाटात करण्याची संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या टोळक्याची संख्या अधिक आहे. वाढदिवसाच्या आनंदी वातावरणात गटातटातील वाद उफाळून आल्याने अनेक ठिकाणी वातावरण गंभीर झाल्याचेही प्रसंग घडतात. त्यामुळे पोलिसांनी याकडे पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिक करीत आहेत.आपल्या मित्राचा वाढदिवस सर्व मित्रमंडळीना हि आनंदाची पर्वणीच असते. मात्र ,या वाढदिवस साजरा करण्याची फॅड शहरात मोठ्या प्रमाणावर होती. त्याची बीजे आता ग्रामीण भागात रुजण्यास सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. भिगवण परिसरात रात्री बारा वाजले आणि तोफा आणि फटाक्याचा आवाज सुरु झाला कि कोणाचा तरी वाढदिवस आहे, हे समजून येते.स्टंटबाजीतुन वाढदिवस साजरे करण्याची विकृती घुसत असल्याचे दिसून येत आहे. ‘बर्थ डे बॉय’ च्या डोक्यात अंडी फोडणे, केक नाकातोंडात भरविणे अशा पद्धतीने सुरवात होते. १०० च्या वर असणाºया तोफांचे आवाज काढण्यात येतात. यावेळी किती वाजलेत याचा विचार न करता डीजे च्या आवाजात धुंद होवून तरुणाचा घोळका मोठ्या प्रमाणावर गोंधळ करताना दिसून येतो. तर आज काल दादाचा ग्रुप ,भाऊचा ग्रुप असे एक ना अनेक ग्रुप गाड्यांचा ताफा घेवून मोठ्या संख्येने वाढ दिवस साजरा करताना गर्दी करताना दिसून येतात. वाढदिवसाच्या वेळी काही जण तर केक कापण्यासाठी तलवारीचा वापर होत असल्याचा तक्रारी नागरिक करीत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक काम करणाºया तरुणांची संख्याही कमी नाही.काहीजण आपल्या वाढदिवसा दिवशी पिडीत आणि वंचित बालकांना सुविधा पुरवून वाढदिवस साजरा करताना आढळून येतात.येथील पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तरुणांनी असे वाढदिवस साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच वाढ दिवस साजरा करताना तलवारीचा वापर केल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करीत आर्मअ‍ॅकट अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.न्यायालयाचा अवमान तरी पोलीस शांतरात्री दहानंतर वाद्य वाजविणे, फटाके फोडणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरी देखील वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता वाद्य वाजवून फटाके फोडले जातात. त्यामुळे न्यायालयाचा अवमान खुलेआम होतो आहे. मात्र तरीदेखील पोलीस कोणाच्या तक्रारीची वाट पाहतात हे समजत नाही. वास्तविक सुमोटो पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक असताना तशी कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Puneपुणे