ऐतिहासिक तलवारीने केक कापणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST2021-02-11T04:12:32+5:302021-02-11T04:12:32+5:30

पुणे : भर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने वाढदिवस साजरा करण्याची सध्या फँशन आली आहे. रविवार पेठेत मध्यरात्रीच्या सुमारास ऐतिहासिक ...

Cake cutter with historic sword | ऐतिहासिक तलवारीने केक कापणारा जेरबंद

ऐतिहासिक तलवारीने केक कापणारा जेरबंद

पुणे : भर रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने वाढदिवस साजरा करण्याची सध्या फँशन आली आहे. रविवार पेठेत मध्यरात्रीच्या सुमारास ऐतिहासिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या ‘बर्थडे बॉय’ला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक केली आहे.

समीर अनंत ढमाले (वय २७, रा. गणेश पेठ, लोणकर वाडा) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २६ इंच लांबीचे दुधारी पाते व ६ इंच लांब नक्षीदार मूठ असलेली ऐतिहासिक तलवार जप्त करण्यात आली आहे.

समीर ढमाले याने मित्रांसोबत २३ जानेवारीच्या मध्यरात्री रविवार पेठेत वाढदिवस साजरा करुन भर रस्त्यात तलवारीने केक कापला होता. पोलीस अंमलदार अजय थोरात यांना तलवार घेऊन समीर रविवार पेठेत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. पुढील कारवाईसाठी त्याला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एका मुलाने ही तलवार दिल्याचे समीर ढमाले याचे म्हणणे आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, महेश बामगुडे यांनी ही कामगिरी केली.

.........

फोटो जेएम एडिटवर

Web Title: Cake cutter with historic sword