सीए टायटन्स, चॅम्प्स सुपर किंग्ज विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:31 IST2021-02-20T04:31:12+5:302021-02-20T04:31:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग ...

सीए टायटन्स, चॅम्प्स सुपर किंग्ज विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेच्या वतीने आयोजित आठव्या बीस्मार्ट सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धेच्या साखळी फेरीत सीए टायटन्स संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. एसआरपीए इलेव्हन, चॅम्प्स सुपर किंग्ज, पेशवा सुपर किंग्ज या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अमित बलदोटाच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने पीएचएम टायगर्स संघावर ४१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चॅम्प्स सुपर किंग्ज संघाने ८ षटकांत ५ बाद ९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पीएचएम टायगर्स संघाला ८ षटकांत ७ बाद ५५ धावाच करता आल्या.
दुसऱ्या सामन्यात पार्थ पडियाच्या खेळीच्या जोरावर एसआरपीए इलेव्हन संघाने किर्तने अँड पंडित संघाचा २८ धावांनी पराभव केला. अथर्व जाधवच्या खेळीच्या जोरावर सीए टायटन्स संघाने किर्तने अँड पंडित संघाचा १७ धावांनी पराभव केला. लोकेश नाहर (४० धावा व २-१९) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पेशवा सुपर किंग्ज संघाने सीए सुपर किंग्ज संघाचा १६ धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदविला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सीए टायटन्स : ८ षटकांत ६ बाद ८१ धावा, अथर्व जाधव ४३, यश बोरा २२, जयेश राजपाल १०, आकाश काळे ३-६, मिथुन भोईटे २-२० वि.वि. कीर्तने अँड पंडित : ८ षटकांत ६ बाद ६४ धावा, अखिलेश जोशी २५, आकाश कक्कर १२, जयेश राजपाल २-६, आदित्य रानडे १-१३, यश बोरा १-१७; सामनावीर-अथर्व जाधव; सीए टायटन्स संघ १७ धावांनी विजयी
पेशवा सुपर किंग्ज : ८ षटकांत ८ बाद ८० धावा, लोकेश नाहर ४०, अक्षय हत्तरगे २६, प्रवीण नलावडे २-१८, प्रसाद मांजरे १-४ वि.वि.सीए सुपर किंग्ज : ८ षटकांत ६ बाद ६४ धावा, प्रवीण नलावडे ३१, लोकेश नाहर २-१९, यश शहा २-१९; सामनावीर-लोकेश नाहर; पेशवा सुपर किंग्ज १६ धावांनी विजयी;
एसआरपीए इलेव्हन : ८ षटकांत ५ बाद ९९ धावा पार्थ पडिया २७, अमन अगरवाल २३, हरप्रीत सरण १६, मिथुन भोईटे २-३२, अनुज जगताप १-१६ वि.वि.कीर्तने अँड पंडित: ८ षटकांत ५ बाद ७१ धावा मिथुन भोईटे नाबाद २२, विपुल शर्मा १५, हर्ष मुथा १०, आनंद डायमा २-१० ; सामनावीर-पार्थ पडिया; एसआरपीए इलेव्हन संघ २८ धावांनी विजयी;
चॅम्प्स सुपर किंग्ज : ८ षटकांत ५ बाद ९६ धावा अमित बलदोटा ६८, चिन्मय जोशी नाबाद १५, मृगांक साळुंके २-१५, रुद्रांग २-१४ वि.वि.पीएचएम टायगर्स: ८ षटकांत ७ बाद ५५ धावा रुद्रांग ३०, विवेक बाज ४-८, अमित बलदोटा १-९; सामनावीर-अमित बलदोटा; चॅम्प्स सुपर किंग्ज संघ ४१ धावांनी विजयी