शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सीए परीक्षेचा निकाल शुक्रवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 19:46 IST

‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे.

ठळक मुद्देजुन्या अभ्यासक्रमासाठी १ लाख २१ हजार ८५० तर नवीन अभ्यासक्रमासाठी ५ हजार ४०६ विद्यार्थीसंकेतस्थळावर पुर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या ई-मेलवरही निकाल पाठविले जाणार

पुणे : दि इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊटंन्टस् आॅफ इंडिया (आयसीएआय)च्या वतीने घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए)च्या अंतिम परीक्षेसह पायाभुत (फाऊंडेशन) व सामायिक प्राविण्य परीक्षेचा (सीपीटी) निकाल शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना ‘आयसीएआय’ संकेतस्थळासह ई-मेल व एसएमएसद्वारेही निकाल मिळणार आहेत. ‘आयसीएआय’मार्फत सीएची अंतिम परीक्षा मे महिन्यात तर अन्य दोन परीक्षा जुन महिन्यात घेण्यात आल्या होत्या. अंतिम परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमासाठी १ लाख २१ हजार ८५० तर नवीन अभ्यासक्रमासाठी ५ हजार ४०६ विद्यार्थी बसले होते. तर सीपीटी परीक्षा ५७ हजार ४२१ व पायाभुत परीक्षा ६ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी दिली आहे.  संस्थेकडून निकाल जाहीर करताना पहिल्या ५० विद्यार्थ्यांची देशपातळीवरील गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ही यादी संकेतस्थळावर उपलब्ध असेल. संकेतस्थळावर पुर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या ई-मेलवरही निकाल पाठविले जाणार आहे. निकालासाठी तीन संकेतस्थळ देण्यात आली असून त्यावर विद्यार्थ्यांना बैठक क्रमांकासह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक टाकून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल मोबाईलवर कळणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. --------------एसएमएसद्वारे निकाल - अंतिम परीक्षा -  CAFNLNEW  CAFND- CACPTपायाभुत परीक्षा -सीपीटी -यापुढे बैठक क्रमांक टाकून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.-------------------------निकालासाठी संकेतस्थळ - www.icaiexam.icai.orgwww.caresults.icai.orgwww.icai.nic.in----------- 

 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थी