सी-सॅटमुळेची असमानता कायमच, निर्णय न झाल्याने निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 03:11 AM2018-01-02T03:11:42+5:302018-01-02T03:11:52+5:30

राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी घेतल्या जाणाºया ‘सीसॅट’च्या पेपरच्या रचनेचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे यूपीएससीप्रमाणेच राज्यसेवेच्या परीक्षेसाठीही सी-सॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला नाही.

 C-SAT disadvantages will always be frustrating, not disappointing | सी-सॅटमुळेची असमानता कायमच, निर्णय न झाल्याने निराशा

सी-सॅटमुळेची असमानता कायमच, निर्णय न झाल्याने निराशा

Next

- दीपक जाधव
पुणे : राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी घेतल्या जाणाºया ‘सीसॅट’च्या पेपरच्या रचनेचा इंजिनिअरिंग, मेडिकल व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे यूपीएससीप्रमाणेच राज्यसेवेच्या परीक्षेसाठीही सी-सॅटचा पेपर केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे परीक्षेतील असमानता कायम राहिल्याची भावना इतर शाखेचे विद्यार्थी व्यक्त करीत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाºया परीक्षा पद्धतीचे राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएसी) मोठ्याप्रमाणात अनुकरून केले जाते. यूपीएससीच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम एमपीएससीकडून फॉलो केला जातो. सी-सॅट पेपरमुळे कला, वाणिज्य आदी शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची टीका झाल्यानंतर यूपीएससीने लगेच सी-सॅट पेपरचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला.
यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीचे अनुकरण करणाºया एमपीएससीने त्यानुसार निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर ४ वर्षे उलटली, तरी अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. यंदा विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाकडे सी-सॅट पेपर केवळ पात्रतेसाठीच ठेवला जावा, याची मागणी लावून धरली
होती. त्यामुळे यंदाची जाहिरात काढताना सी-सॅट पेपरचा निर्णय होईल, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र, एमपीएससीने त्याबाबतचा निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणात निराशा झाली आहे.
सी-सॅटच्या पेपरमध्ये गणित व विज्ञान विषयाच्या प्रश्नांचा भरणा अधिक असतो. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या पेपरची काठिण्यपातळी अधिक असते. उतारा वेळ अधिक जातो. हा पेपर अभियांत्रिकी, मेडिकल, विज्ञान, व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तुलनेने खूपच सोपा जातो. आकलन क्षमता- सर्वसाधारण (ज्ञान), व्यक्तींमधील सुसंवादकौशल्य, तर्कसंगत विश्लेषण व विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय प्रक्रिया व समस्येचे निवारण, सामान्य बुद्धिमापन चाचणी, मूलभूत संख्याज्ञान व सामग्रीचे संकलन, मराठी व इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य यांचा तपासणीसाठी हा पेपर ठेवण्यात आला असला, तरी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी
यांची काठिण्यपातळी एकच राहत नाहीत.
एमपीएससीकडून केवळ ६९ जागांची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचा मोठ्याप्रमाणात अपेक्षाभंग केला, त्याचवेळी सी-सॅट पेपरच्या गुणपद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांचा दुहेरी अपेक्षाभंग झाला आहे.

इतर परीक्षांच्या पर्यायांचाही करावा विचार
राज्यसेवा परीक्षेसाठी केवळ ६९ जागांची जाहिरात निघाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ एमपीएससी व यूपीएससी या दोनच परीक्षांवर अवलंबून न राहता, इतर स्पर्धा परीक्षांचा विचार करावा. दर वर्षी स्टाफ सिलेक्शनच्या ४ ते ५ हजार, कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेसच्या १ हजार, बँकिंगच्या ८ ते १० हजार, रेल्वेच्या १० ते १५ हजार जागा निघतात. या परीक्षांच्या अभ्यासक्रम व पद्धतीची माहिती घेऊन त्याची तयारी विद्यार्थी करू शकतात. त्यामध्ये त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
- विवेक वेलणकर, करिअर मार्गदर्शक

अभ्यासक्रमाचे अनुकरण करता, मग परीक्षापद्धतीचे का नाही?
राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षा अभ्यासक्रमाचे जसेच्या तसे अनुकरण करते. त्याचधर्तीवर यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीचेही त्यांनी अनुकरण करणे आवश्यक आहे. यूपीएससीकडून सी-सॅटबाबत अनेक पातळ्यांवर विचार करून अखेर त्याचे गुण केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमपीएससीनेही निर्णय घेणे आवश्यक होते.
- पंकज निर्मळ, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ मार्गदर्शक

संशोधनाकडे का वळत नाहीत?
इंजिनिअरिंग, मेडिकलमध्ये वरचा क्लास मिळविल्यानंतरही टॉपर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. संशोधनाच्या क्षेत्राकडे वळणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनावर संशोधनाचे महत्त्व बिंबवले जात नाही. पाश्चात्य देशांमध्ये संशोधक, शास्त्रज्ञ यांना मिळणारा मान-सन्मान व आर्थिक सुविधा आपल्याकडे उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर चांगले संशोधन करण्यासाठी संधीदेखील कमी आहेत. पारंपरिक एमएससी केल्यानंतर मूलभूत संशोधनाकडे विद्यार्थी वळू इच्छितात, मात्र त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप, विद्यावेतन याच्या सुविधा खूपच कमी उपलब्ध आहेत.

Web Title:  C-SAT disadvantages will always be frustrating, not disappointing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.