शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
3
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
4
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
5
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
6
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
7
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
8
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
9
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
10
'नीट' रद्द करून गैरप्रकारांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

लोणी भापकरमध्ये दरोडेखोरांचा धुमाकूळ, ४१ हजार व साडेचार तोळे सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 2:30 AM

लोणी भापकर (ता. बारामती) गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यालगत असणा-या अण्णासो सोपाना गोलांडे कुटुंबीयाच्या घरावर अज्ञात ७ दरोडेखोरांनी बुधवारी (दि.१८) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडा टाकून धुमाकूळ घातला.

मोरगाव : लोणी भापकर (ता. बारामती) गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यालगत असणा-या अण्णासो सोपाना गोलांडे कुटुंबीयाच्या घरावर अज्ञात ७ दरोडेखोरांनी बुधवारी (दि.१८) रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडा टाकून धुमाकूळ घातला. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.दरोडेखोरांनी रोख ४१ हजार व साडेचार तोळ्यांचा सोन्याचा ऐवज तसेच घराशेजारील वोडाफोनच्या कंपनीच्या मनोºयाच्या १९ बॅटरी चोरी केल्याची घटना घडली .लोणी भापकर या गावालगत सायंबाचीवाडी रस्त्यावर गावापासून एक किमीच्या अंतरावर शेतात अण्णासो गोलांडे यांचे घर आहे.पहाटे ३ वाजेपर्यंत दरोडेखोरांच्या टोळीने घरामध्ये दहशत पसरवली होती. घरामध्ये अण्णासो सोपाना गोलांडे, कुसुम अण्णासो गोलांडे, स्वाती प्रवीण गोलांडे, सुरेखा सुभाष जाधव होते.शिवराज प्रवीण गोलांडे व पृथ्वीराज प्रवीण गोलांडे या लहान मुलांच्या गळ्याला सुरा लावत घरात सोने, नाणे, रोकड कोठे आहे, याची विचारपूस दरोडेखोर करीत होते.स्वाती गोलांडे यांना मारहाण केली. शेजारील वोडाफोन कंपनीच्या मनोºयाच्या १९ बॅटरी काढून नेण्यात आल्या. दरम्यान सुमारे चार तास घरातील प्रत्येक वस्तूची उलथापालथ त्यांनी केली.स्वातीने रात्री ३ वाजता पोलिसांची गाडी येते, असे सांगितल्यानंतर कुटुंबातील व्यक्तींना दोरीने ने बांधून दरोडेखोर पसार झाले.या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांनी भेट घेतली. सदर ठिकाणी श्वानपथकासह पाचारण करण्यात आले होते.संबंधित घटनेची माहिती समजताच पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी घटनास्थळी भेट देऊन गोलांडे कु टुंबीयांना आधार दिला.उपचारासाठी जमवलेली रक्कम गेली... प्रवीण गोलांडे यांचा अपघात झाला असल्याने व सदर कुटुंब गरीब असल्याने लोणी भापकर गावातील ग्रामस्थांनी मुलाच्या उपचारासाठी सुमारे ४१ हजार रुपये वर्गणी जमा करून सदर कुटुंंबीयांना दिले होते.हे पैसे तसेच चाडेचार तोळे सोनेही लुटून नेले. यामुळे देवकाते यांनी संबंधित कुटुंबीयांना ५० हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. तसेच अपघात झालेल्या मुलास ससून अथवा केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Crimeगुन्हा