जयहिंद ग्रुपच्या माध्यमातून लोणी स्टेशन चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST2021-09-02T04:22:43+5:302021-09-02T04:22:43+5:30
कदमवाकवस्ती : येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांमधील असलेल्या एमआयटी कॉर्नर सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ...

जयहिंद ग्रुपच्या माध्यमातून लोणी स्टेशन चकाचक
कदमवाकवस्ती : येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही गावांमधील असलेल्या एमआयटी कॉर्नर सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठलेले होते. जयहिंद ग्रुप समतानगरच्या तरुणांनी व आदर पूनावाला (क्लीन सिटी टीम) यांनी एकत्र येऊन येथील कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहिमेसाठी १ ट्रॅक्टर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने २ ट्रॅक्टर व १ जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले. कचरा उचलण्यासाठी पप्पू बडदे, निखिल लोहारकर, विक्रम ठोंबरे, प्रशांत चव्हाण, अभिजित पाचकुडवे, दिनेश भाटी, विजय शिंदे, सूरज लोंढे, दशरथ कोटीयान, हॉरस खान, गजानन शिराळे, वैभव चंदनशीवे, संजय शिंदे, अरबाज शेख, शब्बीर करीगर, धनंजय चव्हाण, साद शेख, बाप्पू साबळे व यज्ञेश मगर यांनी मदत केली. या ठिकाणी व्यावसायिक कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या घाणीमुळे पुलाखाली असलेल्या सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी पसरल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने जयहिंद ग्रुप व आदर पूनावला (क्लीन सिटी टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने परिसर साफ करण्यात आला.
310821\fb_img_1630378716425.jpg~310821\fb_img_1630378598896.jpg
साफसफाई पूर्वी पुलाखाली असलेले घाणीचे साम्राज्य~साफसफाई नंतर स्वच्छ झालेला परिसर