लोणी काळभोरला पाच वाळू ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:42+5:302021-03-04T04:17:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुुुद्रुक गावचे हद्दीतील महामार्गावरील अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल ...

Butter seized five sand trucks in the morning | लोणी काळभोरला पाच वाळू ट्रक जप्त

लोणी काळभोरला पाच वाळू ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुुुद्रुक गावचे हद्दीतील महामार्गावरील अवैध वाळू विक्री होत असलेल्या होलसेल बाजारावर महसूल पथकाने सकाळी धाड टाकून कारवाई केली. हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुुमार चोबे यांनी हे स्वतः महसूल पथकासोबत थांबत केलेल्या कारवाईत ५ वाळूचे ट्रक ताब्यात घेतले आहे. या वेळी १ लाख ९६ हजार ६० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारांस प्रांताधिकारी सचिन बारवकर यांंच्या सूचनानुसार अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, मंडलाधिकारी गौरी तेलंग, तलाठी मिलिंद सेठी, योगिराज कनिचे, जी. डी शेख, दादासाहेब झांजे हेे सहभागी झाले होते. या महसूल पथकाने महसूल अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. कारवाईमध्ये ५ वाळूची वाहने ताब्यात घेतली. या वाहनचालक व मालकांकडून १ लाख ९६ हजार ६० रुपये दंड वसूल केल्यानंतर हमीपत्र घेऊन कायदेशीर बाबी तपासल्यानंतर वाहने सोडण्यात आली आहेत.

जिल्ह्यातील दौंड, इंदापूर तालुक्यामधून, तसेच सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातून पुणे शहर व उपनगरात अवैधपणे वाळू विक्रीसाठी येत असते. हवेलीतील मंडलाधिकारी, तलाठी व कोतवाल सातबारा संगणकीकरणाच्या कामामध्ये व्यस्त असल्याने अवैधपणे वाळूउपसा व वाहतूक करणाऱ्या माफियांचे फावले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर पीएमपीएमएल डेपो ते मांजरी बाजार समिती यादरम्यान वाळूूूूचे ट्रक वाळू भरून रात्रीचे वेेळी येऊन थांबतात. पहाटेेेपासूूूून ११ वाजेपर्यंत गरजवंत येथे येेतात. व्यवहार ठरला की वाळू खाली करण्यासाठी ट्रक रवाना होतात. त्यामुळे या परिसराला वाळूचे होलसेल मार्केट अशी ओळख प्राप्त झाली आहे.

यापुुुढील काळात अवैैैैधरित्या गौनखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येेेणार आहे. मंंडल अधिकारी व गावकामगार तलाठी यांना माफियांवर कडक कारवाई करून गुुन्हे दाखल करण्याचे आदेश देेेण्यात आले आहेत. याकामी पोलीस व परिवहन प्रशासनाचे सहकार्य घेेेण्यात येेेणार आहे.

- विजयकुुुमार चोबे (अप्पर तहसीलदार हवेली) :-

फोटो:- शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील वाळूच्या अवैध वाहनांवर कारवाई करताना महसूल पथक.

Web Title: Butter seized five sand trucks in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.