लोणी काळभोरला हातभट्टीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:26+5:302020-12-02T04:05:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : एका मोरारीतून गावठी हातभट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी ...

लोणी काळभोरला हातभट्टीची दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : एका मोरारीतून गावठी हातभट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्याकडून मोटारीसह १ हजार १९० लिटर दारू असा ४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
गोविंद सखाराम गायकवाड (वय २४, रा.भाटनगर, पिंपरी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३०) सकाळी ७.३० च्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना बातमीदारामार्फत एका मोटारीतून गावठी हातभट्टीची तयार दारू शिंदवणे येथून पिंपरी चिंचवड येथे थेऊरमार्गे विक्रीसाठी नेण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली. कांबळे यांनी पोलीस हवालदार महेंद्र चांदणे व संभाजी कदम यांना सोबत घेत थेऊर चौकामध्ये सापळा रचला. वाहनांची तपासणी करताना त्यांना एक संशयित मोटार दिसली. त्यांनी मोटार अडवत तिची झडती घेतली. या वेळी गाडीच्या मागच्या बाजूला ३४ प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ३५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू अशी एकूण १ हजार १९० लिटर तयार दारू आढळली. या ५९ हजार ५०० रूपये किमतीच्या दारूसह ४ लाख रुपये किमतीची मोटार असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.