शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारताच्या विकासासाठी उद्योजकांनी पुढे यावे : नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 20:39 IST

औद्योगिक क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करून संपत्ती निर्माण करणा-या लोकांचा आपण निश्चित अभिमान बाळगायला हवा.

ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रासाठीचे वार्षिक पुरस्कार प्रदान

पुणे : देशातील इतर नागरिकांचा ईशान्य भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या ईशान्य भारतीयांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील यशस्वी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे मत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी व्यक्त केले. डेक्कन चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर तर्फे (डीसीसीआयए) आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात आचार्य यांच्या हस्ते प्रकाश कोरुगेटेडचे अध्यक्ष ओम प्रकाश अगरवाल यांना डीसीसीआयए जीवनगौरव पुरस्कार, निहिलंट टेक्नोलॉजीजचे कार्यकारी उपाध्यक्ष एल. सी. सिंग यांना सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी आचार्य बोलत होते.डीसीसीआयचे अध्यक्ष प्रकाश धोका, उपाध्यक्ष एच. पी. श्रीवास्तव, सचिव रथिन सिन्हा, खजिनदार सुरिंदर अगरवाल, कार्यकारी समिती सदस्य व्ही. एल. मालू, राजीव लोकरे, कमलेश पांचाळ, मुकेश अगरवाल, अनिल गोयल, डॉ. पंडित पाळंदे, महाव्यवस्थापक संध्या कनाकिया या वेळी उपस्थित होते.  या वेळी जॉन डिअर इंडिया यांना सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ विभागासाठीचा, तर फोसेको इंडिया कंपनीस सर्वोत्कृष्ट सुरक्षा उपायांसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आचार्य म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात देदीप्यमान प्रगती करून संपत्ती निर्माण करणा-या लोकांचा आपण निश्चित अभिमान बाळगायला हवा. आपण देशाचे काही देणे लागतो हे आपण विसरता कामा नये. ईशान्य भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. तसेच उत्तम विद्यापीठेही आहेत. येथील उद्योजकांनी ईशान्य भारतातील राज्यांमध्ये आपल्या उद्योगांच्या शाखा सुरू कराव्यात. ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य करावे.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसाय