शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

लोणावळ्यातून व्यावसायिकाचे अपहरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 16:11 IST

एका जागेच्या खरेदीखताकरिता लोणावळ्यात मित्राच्या समवेत आलेले मुंबई येथील व्यावसायिकाचे शुक्रवारी अपहरण झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देविकत घेतलेल्या जागेचे खरेदी खताच्या कामासाठी लोणावळ्यात गोल्डन रंगाच्या होंडासिटी कारमधून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी केले अपहरण

लोणावळा : एका जागेच्या खरेदीखताकरिता लोणावळ्यात मित्राच्या समवेत आलेले मुंबई येथील व्यापारी दिनेशकुमार रामेश्वर शर्मा (वय ५५ , रा. अंधेरी मुंबई) यांचे शुक्रवारी ( दि. १३ एप्रिल ) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामगुलाम छत्री शर्मा (वय ६२, रा.अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली आहे.शर्मा यांनी पवनमावळातील मळवंडी ठूले या ठिकाणी एक जागा विकत घेतली होती. त्या जागेचे खरेदीखत करण्याकरिता ते दोघे शुक्रवारी लोणावळ्यात आले होते. त्यांचे लोणावळ्यातील सहकारी रवी पोटफोडे यांच्या तुंगार्ली येथील हॉटेलवर काहीवेळ ते थांबले होते . त्यानंतर चौहान नावाची एक व्यक्ती भेटायला येणार म्हणून दिनेश शर्मा हे रामगुलाम शर्मा यांच्या तुंगार्ली मधील शंकुतला बंगला येथे गेले असता एका गोल्डन रंगाच्या होंडासिटी कार मधून आलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांना गाडीत बसवून पळवून नेले. रामगुलाम शर्मा यांचा माळी गणेश दळवी व काही रिक्षाचालकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांचा  पाठलाग केला मात्र ते मिळून आले नाहीत असे  फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर करत आहेत.

टॅग्स :lonavalaलोणावळाKidnappingअपहरणCrimeगुन्हाPoliceपोलिस