शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:32 IST

एप्रिल महिन्यात त्यांनी एका वेबसाइटवर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये संपर्क क्रमांक देण्यात आला होता.

पुणे : स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक तरुण पर्वती भागात राहायला आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी एका वेबसाइटवर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर, व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर, व्यावसायिकाला २५ टन तांबे (काॅपर स्क्रॅप) देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. मे महिन्यापर्यंत व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ४८ लाख ७२ हजार रुपये जमा केले.

सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर जहाजाने तांबे पाठवत असल्याचे सांगितले होते. प्रवास खर्चाची बनावट बिले सायबर चोरट्यांनी त्याला पाठवली. जहाजाद्वारे पाठविण्यात येणारा माल न पोहोचल्याने व्यावसायिक तरुणाने सायबर चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड पुढील तपास करत आहेत.

व्यावसायिक महिलेची २५ लाखांची फसवणूक...

स्वस्तात कपडे देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अर्जुन आणि हर्ष मेहता नावाच्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक महिलेची आरोपींची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी महिलेला महिलांचे कपडे स्वस्तात उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. आरोपींना महिलेने रोख स्वरूपात २५ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला कपडे मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सिसाळ तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजी