शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमभंग झालेल्या उद्योजकाकडून तरुणीवर चॉपरने वार ; बोट तुटून पडले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 20:11 IST

प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले.

पुणे : प्रेमभंग झाल्याने एका उद्योजकाने प्रियसीची दुचाकी अडवून तिच्यावर भर रस्त्यात चॉपरने वार केले. या हल्ल्यात प्रियसीच्या डोक्यावर, मानेवर, पाठीवार आणी दोन्ही हातावर गंभीर जखमा झाल्या असून तिचे हाताचे बोट तुटुन रस्त्यावर पडले.  मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता नांदेडफाटा येथे ही घडली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत संबंधीत प्रियसी नागरिकांकडे मदतीची याचना करीत होती. स्थानिकांनी तिला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले. मोहिनी रामसिंग ठाकुर (वय २६) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण धावडे (रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहिनी ठाकुर हिचे ब्युटीपार्लर असून आरोपी धावडे हा उद्योजक आहे. लक्ष्मण हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. आठ वषार्पासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मागील वर्षी त्यांच्यामध्ये काही कारणास्तव भांडण झाले होते. त्यानंतरही लक्ष्मण हा तीच्या मागावर रहात होता. तिला पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्यासाठी वेळोवेळी त्रास देत होता. मंगळवारी रात्री पावणेनऊ वाजता फिर्यादी ब्युटीपार्लर बंद करून दुचाकीवर घरी जात होत्या. त्या नांदेडफाटा येथील बारांगणी मळाजवळ पोहचल्या असता लक्ष्मण याने त्याची कार (एमएच १२ - एस ०१९१) आडवी घालून त्यांना थांबवले. त्यानंतर त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. चिडलेल्या लक्ष्मण याने गाडीतील मागील सीटवर असलेले चॉपरसारखे धारदार हत्यार काढुन मोहीनी यांच्या मानेवर, पाठीवर, दोन्ही हातावर सपासप वार केले त्यात तिच्या डावे हाताचे अंगठ्या शेजारील बोट तुटून पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्या मदतीसाठी याचना करीत होत्या. स्थानिकांनी त्यांना रुग्णालायत दाखल केले.  या प्रकरात लक्ष्मण यावर ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सिंहगड पोलिसांनी दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एम. ननावरे तपास करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीस