पुणे: प्रगत तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या काही वर्षात ईलेक्ट्रीक वाहनांचा वापर देशात होईल. परंतु, त्याही पुढील २० ते २५ वर्षात हायड्रोजनवर वाहने चालतील. कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा कणा हा संशोधनावर अवलंबून असतो. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले. इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया सहयोग समिती आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ह्यइंडकॉनह्णया एकदिवसिय (इंडस्ट्री अ?ॅकॅडमीया कॉन्क्लेव्ह) परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री अरिवंद सावंत बोलत होते. यावेळी ब्लू स्टारचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती व न्युट्रॉन इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स प्रा.लि.चे अध्यक्ष नानिक रूपानी,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एस.परशूरामन, प्र.कुलगुरू डॉ.श्रीहरी होनवाड, सौरभ शहा, प्रविण पाटील,डॉ. प्रसाद खांडेकर आदी उपस्थित होते. अरविंद सावंत म्हणाले, स्मार्ट सिटीसाठी पाणी, वीज आणि परिवहनाची योग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हवी. त्यासाठी औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थेबरोबरच इतरांनी सुध्दा ही जवाबदारी उचलणे गरजेचे आहे. शैलेश हरीभक्ती म्हणाले,कोणत्याही कंपनीच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता असते.भविष्यात न्यूक्लियर पॉवर व एनर्जी क्षेत्रात संधी आहेत. त्यामुळे कंपन्या व शैक्षणिक संस्थांनी काळाची पाऊले ओळखून त्यानुसार संशोधन करावे.कार्यक्रमात राहुल कराड, नानीक रूपानी यांनी मनोगत व्यक्त केले.परिषदेदरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि नामवंत कंपन्या दरम्यान सामजस्य करार झाला.प्रा.डॉ. प्रसाद खांडेकर यांनी प्रास्ताविक तर गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.----------------------------------आर्थिक मंदी, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र शासन आवश्यक पाऊले उचलत आहे,असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.
बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे उद्योगधंद्यानी बदलावे : अरविंद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:05 IST