शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उन्हाच्या तीव्रतेने बाटलीबंद पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 01:09 IST

यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता कमालीची जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली आहे. परिणामी हा व्यवसाय तेजीत आहे.

रहाटणी - यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता कमालीची जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याला मागणी वाढली आहे. परिणामी हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांनी सुरू केला आहे. पाणी शुद्ध केले जाते की नाही, कमी कालावधीत बक्कळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी बाटलीबंद परंतु अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे.उन्हाळ्यात काही विक्रेत्यांकडून बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. काही कंपन्यांचे पाणी ‘मिनरल’ असते तर काही कंपन्या ‘पॅकेज्ड वॉटर’च्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीतआहेत.सर्वत्र पाणपोईंची संख्या घटली आहे. अनेक सेवाभावी संस्था उन्हाळ्यात पाणपोई सुरू करीत होत्या. आता ही स्थिती बदलली आहे. त्यामुळे पाणपोई अथवा नळावर जाऊन पाणी पिणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. सर्वांना बाटलीबंद पाण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. आता बाटलीबंद पाणी विकत घेणे म्हणजे प्रतिष्ठेचेही लक्षण झाले आहे. हॉटेलातील पाणी पिणेही टाळण्यात येत असून बाटलीबंद पाणी खरेदी करण्यात येत आहे.काही व्यावसायिक वापरलेल्या बाटल्यांमध्ये नळाचे पाणी भरून ते थंड करून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. सामान्य नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून याबाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणी विक्रेते ग्राहकांची लूट करीत आहेत. यातूनच पाणी विक्रीचा व्यवसाय आता ग्रामीण भागातही फोफावू लागला आहे.बॉटल, पाऊचवर तारीख दिसत नाहीपॅकबंद वस्तूंच्या वेष्टनावर निर्मिती आणि त्या वस्तूच्या उपयुक्ततेचा कालावधी नमूद करणे कायद्याने बंधनकारक आहे. संबंधित वस्तू कोणत्या तारखेला उत्पादित झाली, ती किती दिवस टिकणार आहे, अंतिम मुदत कधीची आहे, याबाबत त्या वस्तूच्या वेष्टनावर सर्व बाबी नमूद करणे संबंधित उत्पादक कंपनीला बंधनकारक आहे. मात्र अनेक कंपन्या पाण्याची बाटलीवर असा उल्लेख करीत नाहीत, असा उल्लेख असला तरी तो अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही, अशा पद्धतीने नमूद केलेले असते.अनेक घरांमध्ये तर पाण्याच्या कॅन जात आहे. त्यांची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे, म्हणून ग्राहक ते विकत घेतात. यातून ग्राहकांची लूट होत असून त्यांच्या आरोग्याशीही खेळले जात आहे. कोणत्याही हॉटेल, पानठेल्यावर आता एक लिटर पाण्याची बाटली किमान २0 रुपयांना मिळत आहे. अनेक शीतपेय निर्मिती कंपन्याही बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. स्थानिक कंपन्याही या व्यवसायात उतरल्या आहेत.अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीनबाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि, परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागही उदासीन दिसत आहे. यातून ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाने पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासण्याची गरज आहे. त्या पाण्यातील विविध घटकांची तपासणी करणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी केवळ पाणी थंड करून ते विकले जाते. त्यात कोणते घटक आहे, कोणते घटक नाहीत, याबाबत सामान्य ग्राहकांना माहिती नसते. ते पाणी आरोग्यास घातक आहे का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग उदासीन असल्याचेच दिसून येत आहे़

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे