व्यावसायिकास गंडा

By Admin | Updated: February 13, 2017 02:15 IST2017-02-13T02:15:06+5:302017-02-13T02:15:06+5:30

बांधकाम व्यावसायिकाने विश्वासाने ठेवायला दिलेल्या ७९ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह महत्त्वाच्या कागदपत्रांचा अपहार केल्याप्रकरणी

Business owner | व्यावसायिकास गंडा

व्यावसायिकास गंडा

पुणे : बांधकाम व्यावसायिकाने विश्वासाने ठेवायला दिलेल्या ७९ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसह महत्त्वाच्या कागदपत्रांचा अपहार केल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा ऐवज परत करण्यासाठी २५ लाखांची मागणी करीत पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिली.
नवनाथ बाजीराव मोहिते (रा. नेवासा, अहमदनगर), रघुनाथ मोहिते, किसन जगन्नाथ चव्हाण (रा. रांजणी, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कल्पेश ओसवाल (वय ४३, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. ओसवाल यांच्याकडे आरोपी सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत होते. ओळख झाल्यानंतर ओसवाल यांनी त्यांच्याकडील ७९ लाखांचे सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे विश्वासाने आरोपींकडे ठेवण्यास दिली होती.
ती त्यांनी परत मागितले असता आरोपींनी देण्यास नकार दिला. व परत करण्यासाठी २५ लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास चव्हाण याच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्याची धमकी दिली. पुढील तपास खंडणीविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Business owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.