व्यवसायभिमुखतेच्या डिझायनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:17+5:302021-09-02T04:24:17+5:30

डिझायनर असलेल्या देवयानी हजारे यांनी एकातून दुसरा व्यवसाय सुरू करत व्यवसायभिमुखतेच्या डिझायनिंगचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. स्वत: काहीतरी ...

Business-oriented designers | व्यवसायभिमुखतेच्या डिझायनर

व्यवसायभिमुखतेच्या डिझायनर

डिझायनर असलेल्या देवयानी हजारे यांनी एकातून दुसरा व्यवसाय सुरू करत व्यवसायभिमुखतेच्या डिझायनिंगचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. स्वत: काहीतरी घडविण्याच्या जिद्दीने त्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान आहे.

देवयानी हजारे यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी आणि गडहिंग्लज येथे पिण्याच्या आरओ पाण्याचा प्रकल्प आहे. त्याचबरोबर पुण्यात क्लॉथ सेंटरही आहे. आरओ प्रकल्प सुरू करण्याची कल्पना त्यांनी सहज सुचली. कष्टाने त्यांनी प्रत्यक्षात आणली. वेदगंगा आरओ नावाने स्वतःची पिण्याच्या पाण्याची कंपनी सुरू केली. नवीन व्यवसायात उतरल्यानंतर त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. आपल्या व्यवसायाच्या शाखा कशा वाढवता येतील, याकडेदेखील त्यांनी प्रकर्षाने लक्ष दिले. आता त्यांच्या वेदगंगा या कंपनीचा आदर्श घेऊन १६ लोकांनी स्वतःचा सुरू केला आहे, असे देवयानी सांगतात.

एका महिलेने कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात एकाच वेळेस नवनवीन व्यवसाय करणे ही तशी उल्लेखनीय गोष्ट म्हणावी लागेल. देवयानी हजारे यांनी अनेक व्यवसायात यशस्वीपणे साधलेल्या प्रगतीला पतीचे मोठे पाठबळ असल्याचे देवयानी सांगतात. देवयानी यांचे पती आणि मुलं हे "तू स्वतःचे काही तरी कर" असा सल्ला द्यायचे त्यामुळे त्यांना वेगवेगळे व्यवसाय करायला मोठी प्रेरणा मिळाली. व्यवसायात सहकार्य मिळणे खूप गरजेचे असते. त्यांना भावाचीही मोठी मदत झाली. घर, संसार आणि लहान मुलांना सांभाळत देवयानी यांनी व्यवसायात साधलेली प्रगती थक्क करून करणारी आहे.

देवयानी यांना डायमंड व्यवसायात पदार्पण करायचे आहे. 'डायमंड गर्ल' म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. देवयानी यांच्या व्यवसायात कोल्हापूर आणि गारगोटी येथील लोकांनी मदत केली. त्यांच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत अनेक मान-सन्मानही प्रदान केले आहेत.

देवयानी या सामाजिक कार्यातदेखील आवडीने सहभाग नोंदवत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक गरजू लोकांना सहकार्य केले आहे. वाशिम येथील 'चेतन सेवांकूर ग्रुप' या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या समूहात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात वाशिममध्ये दहा वर्षे राहिल्याने त्यांची तिथल्या लोकांशी नाळ जोडली गेली आहे. गेली १३ वर्षे त्या सामाजिक कार्य करत आहेत. अनाथ मुलांना शिधा पुरविणे, ऑर्केस्ट्रा चालवून कलागुणांना वाव देण्याचे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. अनेक मुलांना त्यांनी वाद्यही घेऊन दिली आहेत.

Web Title: Business-oriented designers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.