बसस्थानक नॉट-रिचेबल
By Admin | Updated: January 8, 2015 23:11 IST2015-01-08T23:11:13+5:302015-01-08T23:11:13+5:30
दौंड एसटी आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षाची दूरध्वनी सेवा गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नागरिकांना वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येत नाही.

बसस्थानक नॉट-रिचेबल
अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७२ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिध्द लेखक, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. मकर संक्रांतीला होणारे हे संमेलन यंदा औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळ चौकामध्ये गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे.
संमेलनासाठी विख्यात साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कारप्राप्त अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात १२ ते ३ या वेळेत वसंत पाटील (रा. पणुंब्रे, ता. शिराळा) यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. प्रसाद वितरण, ग्रंथदालन (सांगली) यांच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नरेंद्र चपळगावकर यांनी संस्थानिकांवर व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक व ‘कर्मयोगी संन्याशी, राज्य घटनेचे अर्धशतक, भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विधिमंडळ आणि न्यायसंस्था, संघर्षाचे सहजीवन, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ आदी पुस्तकांचे लेखन केले आहे. वसंत पाटील यांच्या ‘कविता धरणाआधी आणि नंतरच्या’ या काव्यसंग्रहास ११ पुरस्कार मिळाले आहेत. (वार्ताहर)