शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाची ‘मोबाईल’ घेणी कसरत : प्रवाशाकडून छायाचित्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 19:38 IST

तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते.

ठळक मुद्देचालकांच्या बेशिस्त वर्तनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे

पुणे : रात्रीच्यावेळी वर्दळीच्या रस्त्यावर मोबाईलवर बोलत बिनधास्तपणे बस चालवून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बसमधील एका प्रवाशाने या घटनेचे छायाचित्रण केले आहे. चालक मोबाईलवर बोलता-बोलता एका हाताने स्टेअरिंग व गिअर नियंत्रित करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) चालकांच्या बेशिस्त वर्तनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.बस चालवत असताना चालक मोबाईलवर बोलत असल्याचे दृश्य पुणे शहरात तसे नवीन नाही. अनेकदा प्रवाशांनी छायाचित्र काढून याकडे ‘पीएमपी’ प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी अशा पध्दतीने मोबाईलवर बोलत प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बेशिस्त चालकांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात असे प्रकार जवळपास बंद झाले होते. मात्र, त्यांच्या बदलीनंतर आता पुन्हा अनेक चालक बिनदिक्कतपणे मोबाईलवर बोलत बस दामटत असल्याचे प्रकार सातत्याने घडू लागले आहेत. असाच एक प्रकार पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी मोबाईलवर टिपला आहे.शितोळे हे शुक्रवारी सायंकाळी कात्रज ते हडपसर या बसने प्रवास करत होते. त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० ते ६० प्रवासी होते. ही बस ठेकेदाराकडील होती. संबंधित चालक धनकवडी ते पद्मावती यादरम्यान मोबाईलवर बोलत होता. बालाजीनगरजवळ बसमधून उतरत असताना शितोळे यांनी चालक मोबाईलवर बोलत असल्याचे छायाचित्रण सुरू केले. रात्री आठच्या सुमारास या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. एका हातात मोबाईल धरून चालक एका हाताने स्टेअरिंग, गिअर नियंत्रित करत होता. दोन मिनिटे रेकॉर्डिंग करूनही चालक बोलायचे थांबत नसल्याचे पाहून शितोळे यांनी वाहकाला बोलावून मोबाईल बंद करण्यास सांगितले. पण काहीवेळ संबंधित चालकाने त्याकडेही दुर्लक्ष करून हेडफोन लावला. अखेर वाहकाने सातत्याने सांगितल्यानंतर चालकाने मोबाईल बंद केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. प्रवाशांच्या जीवाची किंमत १०० रुपये     बसमधील ५० ते ६० प्रवासी आणि रस्त्यावरील इतर वाहनांची पर्वा न करता चालकाकडून मोबाईलवर जवळपास ४ ते ५ मिनिटे बोलणे सुरू होते. याबाबत शुक्रवारी रात्रीच पीएमपीकडे तक्रार केली होती. शनिवारी सायंकाळी संबंधित चालकावर शंभर रुपये दंडात्मक कारवाई केल्याचा संदेश मोबाईलवर आला आहे. प्रशासनाकडून अत्यंत निष्काळजीपणे या प्रकाराकडे पाहिले जात असल्याचे यावरून दिसते, असे संजय शितोळे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकMobileमोबाइलpassengerप्रवासी