पुण्यात जळीतकांड कायम, २ कार, १५ बाईक्स जाळल्या

By Admin | Updated: March 29, 2016 08:43 IST2016-03-29T08:40:19+5:302016-03-29T08:43:01+5:30

पुण्यात जळीतकांड अद्याप सुरच असून कात्रज परिसरात मध्यरात्री आगीत २ कार व १५ दुचाकी जळून खाक झाल्या.

Burnt burns in Pune, 2 cars, 15 bikes burnt | पुण्यात जळीतकांड कायम, २ कार, १५ बाईक्स जाळल्या

पुण्यात जळीतकांड कायम, २ कार, १५ बाईक्स जाळल्या

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - समाजकंटकानी गाड्यांना आग लावून त्या खाक करण्याचे जळीतकांडाचे सत्र पुण्यात अद्याप कायम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज परिसरातील २ कार व १५ बाईक्स जळून खाक झाल्या असून त्यात एक व्यक्ती जखमीही झाली. 
कात्रज परिसरात रात्रीच्या सुमारास प्रचंड धूर पसरल्याने आग लागल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करून गाड्यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत २ कार व १५ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाल्या होत्या. दरम्यान या प्रकारामागे नक्की कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

Web Title: Burnt burns in Pune, 2 cars, 15 bikes burnt