शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

'YCM मध्ये बर्निंग वार्ड निर्माण करावा...'; तळवडेतील आगीचे पडसाद नागपूर अधिवेशनात

By विश्वास मोरे | Updated: December 11, 2023 18:55 IST

मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले....

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिकनगरीमधील तळवडे येथील कारखान्यास लागलेल्या आग प्रकरणाचे पडसाद नागपुर अधिवेशनात उमटले. विधानपरिषदेत सोमवारी चर्चा झाली. प्रकरणाची चौकशी करावी, मृतांना मदत द्यावी. वायसीएममध्ये आग घटनेतील रुग्णाच्या उपचारासाठी बर्न वार्ड निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यावर औद्योगिक परिसरात लायसननुसार उदयॊग सुरु आहेत कि नाहीत, याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाहीर केले.

राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे हिवाळी अधिवेनश सुरू आहे.शुक्रवारी  पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील ज्योतिबानगर येथे फायर कँडल कंपनीमध्ये आग लागली. त्यामध्ये आतापर्यंत ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि उपायोजना कराव्यात,  याबाबत आमदार उमा खापरे यांनी औचित्याचा मुद्दा विधानपरिषदेत मांडला. त्यावर पीठासन अधिकारी नीलम गोर्हे यांनी परवानगी दिली.

आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड हा औद्योगिक परिसर असून त्या परिसरामध्ये छोटे-मोठे लघु उद्योग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले काही वर्षांपासून आगीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत. तळवडे येथील घटना घडली. त्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी होणार आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यामध्ये लायसन्स एका विषयाचं होतं आणि काम दुसऱ्या विषयाचे सुरू होतं. याबाबत औद्योगिक परिसराचा सर्वे व्हायला हवा. त्याचबरोबर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना २५ लाख तसेच जखमी असणाऱ्या व्यक्ती ने कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करावी. त्याचबरोबर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये बर्नवॉर्ड तयार करावा. मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यासाठी शासनाच्या वतीने तातडीने प्रयत्न करावेत. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, औद्योगिक परिसरामध्ये एका गोष्टीचा परवाना घेऊन दुसरे काम सुरू आहे असते.  याबाबतचे सर्वेक्षण करण्यात येईल.  नियमानुसार कामे सुरू आहेत की नाही हे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अपघातातील मृत्यू मुखी पडलेले तसेच जखमी असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत देण्यात येईल.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnagpurनागपूर