वडगाव रासाई मध्ये पाच एकर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST2021-05-23T04:11:18+5:302021-05-23T04:11:18+5:30
जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना २१ मे रोजी ...

वडगाव रासाई मध्ये पाच एकर ऊस जळून खाक
जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना २१ मे रोजी घडली.
याबाबत नागरिकांनी सांगितलेली माहिती अशी की, २०१५ साली पासून या विद्युत वाहक तारा खराब झाल्याने याअगोदर दोन ते तीन वेळा याच शेतकऱ्यांचे ऊस जळाले होते. या विद्युत वाहक तारा दुसरीकडे हलविण्याबाबत या शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला होता. महावितरणच्या गलथान कारभारामुळे सुभाष ढवळे व स्वप्निल ढवळे या शेतकऱ्यांचे अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले असून याप्रकरणी दखल न घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महावितरण कंपनीने कारवाई करावी अशी मागणी शेतकरी स्वप्निल ढवळे यांनी केली आहे. या जळालेल्या उसाचा वडगाव रासाईचे गाव कामगार तलाठी कोळगे यांनी पंचनामा केला असून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने, कनिष्ठ अभियंता वडगाव रासाई आशिष मेश्राम यांनी घटनास्थळी पाहणी केली असून याबाबत लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली जाईल आणि या विद्युत वाहक तारा अन्यत्र हलविण्यात येतील असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.
--
फोटो क्रमांक : २२ रांजणगाव सांडस पाच एकर ऊस जळाला
(फोटो ओळी ) : वडगाव रासाई विद्युत तार तुटल्यामुळे जळून खाक झालेला ऊस