शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच; ४ वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

By नितीश गोवंडे | Updated: June 20, 2024 15:43 IST

शहरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...

पुणे : शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून, दररोज शहरातील विविध भागांमध्ये घरफोडीच्या प्रकरणात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत आहेत. बुधवारी (दि. १९) शहरातील चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे संबंधित फिर्यादींनी म्हटले आहे.

पहिल्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव बुद्रुक येथील घरफोडीत ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी राधाबाई विजय देशमुख (३४, रा. शिवसिद्धी अपार्टमेंट, श्रीराम मंदिराजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. राधाबाई या सांगली जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमाला गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेजारी राहणाऱ्या त्यांच्या नणंद राणी डोबां‌ळे यांच्याकडे गेली होती. यावेळी बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रेणुसे करत आहेत.

दुसऱ्या घटनेत सिंहगड रस्ता परिसरात राहणारे स्वप्नील तानाजी निंबाळकर (३१, रा. श्री अ`व्हेन्यू बिल्डिंग, संभाजी पार्क शेजारी) हे मंगळवारी (दि. १८) त्यांच्या घराला कुलूप लावून पाहुण्यांकडे गेले होते, यावेळी चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटाच्या लॉकरमधील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, टीव्ही, मिक्सर व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक उत्तेकर करत आहेत.

तिसऱ्या घटनेत, उमर सिराज मुजावर (२९, रा. संघर्ष चौकाजवळ, चंदननगर) यांचे येथे ऑफिस आहे. या ऑफिसचे कुलूप तोडून चोरांनी १ लाख १० हजार रुपये किमतीचा ल`पटॉप व मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस हवालदार नानेकर करत आहेत.

चौथ्या घटनेत चुनाराम मगराम चौधरी (२८, रा. रुणवाल पार्क, बिल्डिंग नं. ५, मार्केटयार्ड) यांचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानाचे शेटर उचकटून चोरांनी रोख रकमेसह, मोबाईल आणि बॉडी स्प्रे असा १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड