मंतरवाडीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST2021-05-06T04:09:32+5:302021-05-06T04:09:32+5:30

याप्रकरणी सोमनाथ बबन यादव (वय ३८, रा. सवाई गोल्ड मंतरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात ...

Burglary in Mantarwadi | मंतरवाडीत घरफोडी

मंतरवाडीत घरफोडी

याप्रकरणी सोमनाथ बबन यादव (वय ३८, रा. सवाई गोल्ड मंतरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार: पत्नी व मुले आईकडे राहण्यास असल्याने फिर्यादी यादव हे सोमवार (३ मे) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरास कुलूप लावून आई लीलाबाई बबन यादव यांच्याकडे गणेशनगर, सासवड रोड, फुरसुंगी (ता. हवेली) येथे मुक्कामी राहण्यास गेले होते.

मंगळवार (४ मे ) रोजी सकाळी ते पुन्हा आपले घरी मंतरवाडी येथे आले असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता हॉलमधील एलईडी टीव्ही दिसून आला नाही. कपाटाचे लॉक कशाचेतरी साह्याने तोडलेले दिसून आले. त्या वेळी त्यांनी लॉकरमधील ठेवलेले २० हजार रुपये मिळुन आले नाहीत. म्हणून ते सोसायटीचे सीसीटीव्ही चेक करण्यासाठी गेले असता चोरट्याने डिव्हीआर चोरून नेलेला दिसला.

Web Title: Burglary in Mantarwadi