कात्रज, येवलेवाडीत घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST2021-06-01T04:08:40+5:302021-06-01T04:08:40+5:30

पुणे : शहरातील कात्रज आणि येवलेवाडीतील इमारतीतून बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ३५ हजारांचा ऐवज ...

A burglary in Katraj, Yeolawadi stole Rs | कात्रज, येवलेवाडीत घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

कात्रज, येवलेवाडीत घरफोडी सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

पुणे : शहरातील कात्रज आणि येवलेवाडीतील इमारतीतून बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला.

बंद मेडिकलचे शटर उचकटून तीन चोरट्यांनी २१ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नवकार मेडिकलमध्ये घडली. याप्रकरणी प्रफुल्ल मनोत (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी येवलेवाडीतील एन. के. हाईट्समधील दोन बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून १ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सचिन पवार (वय ३६) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय चोरट्यांनी त्याच इमारतीतील स्वाती माने यांच्या घरातून ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी जुनीला उमर मुलाणी यांच्या मोटारीची नंबरप्लेट चोरून नेली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक खेतमाळीस तपास करीत आहेत.

Web Title: A burglary in Katraj, Yeolawadi stole Rs