शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुणे शहरात चार ठिकाणी घरफोडी; पावणे सात लाखांचा मुद्देमाल लंपास

By नितीश गोवंडे | Updated: March 14, 2024 16:04 IST

शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी ६ काख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे...

पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असून १ जानेवारी पासून २९ फेब्रुवारीपर्यंत शहरात ८० पेक्षा अधिक घरफोड्यांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. बुधवारी (ता. १३) शहरातील लष्कर, भारती विद्यापीठ, सिंहगड आणि येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी ६ काख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

पहिल्या घटनेत कॅम्प भागातील राजस्थान भवन जवळील एका दुकानाच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी भरत शंकर सुतार (५३, रा. शिवनेरी नगर कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ ते १३ मार्च दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी भरत सुतार यांचे कॅम्प मधील कोळसा गल्ली येथे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.दुसऱ्या घटनेत कात्रज येथील संतोष नगर येथील एका घराचे भर दुपारी कुलूप तोडून सोन्या, चांदीचे दागिन्यासह रोख रक्कम असा २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमजानबी दाऊद शेख (४५, रा. संतोष नगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी रमजानबी शेख यांचे घराच्या कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असे २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भिंगारे करत आहेत.तिसऱ्या घटनेत बेनकर वस्ती, धायरी येथे भरदुपारी एका दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी ललित दत्तात्रय सपकाळ (३५, रा. बेनकरवस्ती, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १२ मार्च रोजी दुपारी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी ललित पाटील हे घराला कुलूप लावून खासगी कामाला गेले होते. चोरट्यांनी याचा फायदा घेत कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधील लोखंडी लॉकर मधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे २ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड तपास करत आहेत. तर चौथ्या घटनेत वडगाव शेरी एका घरातील लॉकर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १ लाख ४८ हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी महादेवी शंकर राठोड (३६, रा. भाजी मंडई, वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महादेवी राठोड यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून हॉल मधील कपाटाच्या लॉकर तोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १ लाख ४८ हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड