शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदारांसह ९ घरात चोऱ्या; ८ नावांनी लुटले तब्बल ६० लाख; तामिळनाडुतून महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 21:19 IST

जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला तामिळनाडुहून जेरबंद केले.

पुणे : कामाची गरज असल्याचे सांगून घरकाम करण्यास सुरुवात करुन जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी तामिळनाडुहून जेरबंद केले.

शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडु) असे या महिलेचे नाव आहे. चंद्रन वेगवेगळी नावे धारण करुन डिसेंबर २०१८ पासून लोकांची मोलकरीण बनून चोऱ्या करत असल्याचे उघडकीस आले असून आतापर्यंत ९ घरांमध्ये तिने अशा प्रकारे चोरी करुन ६० लाख १० हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते. त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती.घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते. तिने ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरुन नेले होते. त्यानंतर ती तामिळनाडुला आपल्या गावी पळून गेली होती.

याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असलेले कुटुंब हेरुन ही महिला आपण गरजू असल्याचे सांगत असे. त्यांच्याकडे कामाला सुरुवात करीत. तिच्याकडे आधार कार्ड, फोटो मागितला की उद्या आणून देते असे सांगून दोन तीन दिवस काम करीत असे. त्यात ती घरातील दागिने, कपाट पाहून ठेवत. त्यानंतर एके दिवशी त्यांच्या जेवणात किंवा पाण्यात झोपेच्या गोळ्या टाकत. ज्येष्ठ नागरिकांना गुंगी आली की घरातील सर्व ऐवज घेऊन पळून जात असे. कोठेही तिने आपली ओळख होईल, अशा बाबी ठेवल्या नव्हत्या. वानवडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून ही महिला तामिळनाडुमध्ये गावी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तामिळनाडुतून तिला पकडून आणले. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करत आहेत.....पुण्यातील माजी महिला आमदार यांच्या घरीही गेल्या वर्षी नोव्हेबरमध्ये या महिलेने अव्वा असे नाव सांगून त्यांच्याकडे घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या घरातून १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता......स्वत:चा औषधांचा गुन्ह्यांसाठी केला गैरवापरशांती चंद्रन हिला अनेक विकार आहेत. त्यासाठी तिला डॉक्टरांनी झोपेच्या गोळया दिल्या होत्या. या गोळया लोकांच्या जेवणात, पिण्याच्या पाण्यात टाकून त्यांना गुंगी आल्यावर घरातील ऐवज चोरुन नेत होती.

टॅग्स :PuneपुणेTamilnaduतामिळनाडूWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटकRobberyचोरी