घरफोडी करणाऱ्या सराईतांना दीड वर्षानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:43+5:302021-04-01T04:12:43+5:30
किशोर शंकर मोरे (वय ३३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा. पर्वती दर्शन) ...

घरफोडी करणाऱ्या सराईतांना दीड वर्षानंतर अटक
किशोर शंकर मोरे (वय ३३, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), आनंद ऊर्फ बारक्या गणपत जोरी (वय ३२, रा. पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मोरे याविरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात ८, सहकारनगर २ तर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. तर जोरी विरोधात विश्रामबाग व दत्तवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी २ तर तळेगाव दाभाडे, देहूरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत २२ ते २३ सप्टेंबर २०१९ रोजी पर्वती दर्शन परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी अनिकेत अशोक खुडे ऊर्फ शायना गुरू (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे.