नोकरीच्या आमिषाने अधिकाऱ्याने फसविले
By Admin | Updated: January 24, 2017 02:30 IST2017-01-24T02:30:11+5:302017-01-24T02:30:11+5:30
शासनाच्या कृषी विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने एका कृषी अधिकाऱ्यानेच कर्मचाऱ्याला दहा लाखांचा गंडा घातला आहे.

नोकरीच्या आमिषाने अधिकाऱ्याने फसविले
पुणे : शासनाच्या कृषी विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने एका कृषी अधिकाऱ्यानेच कर्मचाऱ्याला दहा लाखांचा गंडा घातला आहे. बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार १३ डिसेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत घडला.
कृषी अधिकारी प्रकाश लहुजी धुरंधर (सध्या रा. यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कर्मचारी प्रकाश गंगा राठोड (वय २७, देशमुखवाडी ता. जळगाव, जामोद, जि. बुलडाणा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड जळगाव जामोद येथील कृषी विभागात शिपाई म्हणून नोकरी करतो. धुरंदर पुण्यामध्ये कृषी अधिकारी होता. सध्या त्याची नेमणूक यवतमाळमध्ये उपजिल्हा कृषी अधिकारी पदावर आहे. राठोड कार्यालयीन कामासाठी डिसेंबर २०१५ मध्ये पुण्यामध्ये आले होते. त्या वेळी धुरंदर याच्याशी ओळख झाली होती. त्याने राठोड यांना कृषिसेवक पदावर भरती करून घेण्याचे आमिष दाखवले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करांडे करीत आहेत.