पिसाळलेल्या कुत्र्याचा ५ जणांना चावा
By Admin | Updated: March 24, 2017 03:59 IST2017-03-24T03:59:32+5:302017-03-24T03:59:32+5:30
भोर तालुक्यातील वरवडी खुर्द येथील ५ जण पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्याचा ५ जणांना चावा
नेरे : भोर तालुक्यातील वरवडी खुर्द येथील ५ जण पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. उपचारांसाठी त्यांना शासकीय रुग्णालयांत नेले असता, दोन महिन्यांपासून रोगप्रतिबंधक रॅबीज लस उपलब्ध नसल्याने उपचारांसाठी ससून येथे पाठविण्यात आले़
बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान गावात पिसाळलेले कुत्रे शिरले. त्याने विठ्ठल धोंडिबा वरे, लक्ष्मी मोहन चव्हाण, गेणबा गणपती वरे, शंकर लक्ष्मण वरे, प्रकाश हरिभाऊ नागवडे या पाच जणांना चावा घेतला. यात ते गंभीर जखमी झाले़ जखमींना नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले़ मात्र, आरोग्य केंद्राला कुलूप होते़. त्यामुळे भोर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तेथेही लसउपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांना ससूनला पाठविले. (वार्ताहर)