धमकावून लुटले
By Admin | Updated: June 17, 2015 01:20 IST2015-06-17T01:20:16+5:302015-06-17T01:20:16+5:30
धमाकावून, जबरदस्तीने पैसे व वस्तू हिसकाविण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. शिवाजीनगर, वडगाव बुद्रुक, हडपसर येथे या घटना घडल्या.

धमकावून लुटले
पुणे : धमाकावून, जबरदस्तीने पैसे व वस्तू हिसकाविण्याच्या तीन घटना शहरात घडल्या. शिवाजीनगर, वडगाव बुद्रुक, हडपसर येथे या घटना घडल्या. यातील हडपसर घटनेतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मंगेशसिंग विजयसिंग जुनी (वय २१) व लाजबिन मोहंमद सय्यद (वय ३६, दोघेही रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात मारुती कोनगुरे (वय ४०, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली होती. कोनगुरे १४ जूनला रात्री ११च्या सुमारास अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर रस्त्यावर रविदर्शन या खासगी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. त्या वेळी दोन व्यक्ती रिक्षातून येऊन त्यांनी कोनगुरे यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर कोनगुरे यांनी आरडाओरडा केला आणि पोलीस कंट्रोलला फोन करून माहिती दिली. हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशीत एका नागरिकाने आरोपींची ओळख सांगितली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन जुनी व सय्यद यांना ताब्यात घेतले.
दुसरी घटना शिवाजीनगर येथे घडली. याप्रकरणी सूरज भोंडवे (वय २३, रा. शिवाजीनगर) यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोंडवे ११ जूनला पहाटे साडेचारच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील म्हसोबा गेट येथून पायी जात असताना, एका व्यक्तीने दुचाकीवरून येऊन त्यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातून ५ हजार रुपये काढून घेतले. (प्रतिनिधी)