खोरला शौचालय बांधा... मोहीम
By Admin | Updated: November 14, 2016 02:14 IST2016-11-14T02:14:12+5:302016-11-14T02:14:12+5:30
ग्रामपंचायतीने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण खोरगावात हगणदरी मुक्तीच्या दिशेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार या भागामधून या मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद

खोरला शौचालय बांधा... मोहीम
खोर : ग्रामपंचायतीने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून संपूर्ण खोरगावात हगणदरी मुक्तीच्या दिशेने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार या भागामधून या मोहिमेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
शौचालय बांधा.....शौचालय वापरा.... अशी जनजागृती आता करण्यात असून, ही मोहीम सध्या अंतिम टप्प्यामधील असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषद पुणे व दौंड पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला ग्रामीण भागामधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले आहे. येत्या ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत ज्या लाभार्थ्यास वैयक्तिक शौचालय नसल्यास त्या लाभार्थ्यास शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा फायदा मिळणार नाही, हे स्पष्ट केले आहे.
खोर येथे सरपंच सुभाष चौधरी, संपर्क अधिकारी डॉ. बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. १२) रोजी खोर गावामधून प्राथमिक शाळा व श्री भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शौचालय बांधा... शौचालय वापरा... या विषयी जनजागृती मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम अंतिम टप्प्यामधील असून, ३० नोव्हेंबरनंतर लाभार्थ्यास शासनाच्या सर्वच प्रकारच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येणार असल्याचे खोर ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. या मोहिमेस सरपंच सुभाष चौधरी, ग्रामविकास अधिकारी अशोक लोणकर, तसेच शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.