शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ई-वेस्टपासून ६00 ड्रोन बनविण्याचा 'प्रताप'; २२ व्या वर्षी १२८ देशांतून आले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 04:16 IST

वयाच्या चौदाव्या वर्षी लागली गोडी

- श्रीकिशन काळे पुणे : वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला ड्रोनचे वेड लागले आणि तो आज केवळ २२ व्या वर्षीच आधुनिक तंत्रज्ञानाचा ड्रोन बनविणारा जागतिक वैज्ञानिक बनला आहे. तो ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करतो आणि आतापर्यंत ६०० ड्रोन तयार केले आहेत. आता तो अनेक संस्थांसोबत काम करत असून, ड्रोन बनविण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडलही मिळाले आहे. प्रताप एन. एम. असे त्याचे नाव असून, तो एका कार्यक्रमासाठी पुण्यात आला होता. तेव्हा त्याने आपल्या यशाचा पट उलगडून सांगितला.

कर्नाटकमधील निताकली या एका लहानशा गावातून शिक्षण घेत ड्रोनमध्ये ‘एकलव्य’ बनून आज तो जगासाठी ‘ड्रोन गुरू’ बनला आहे. प्रतापने स्वत:मधील कला जाणून या ड्रोनच्या क्षेत्रात उंच भरारी मारली आहे. सुरवातील ८८ वेळा तो यात अपयशी झाला. पण तरी त्याने जिद्द सोडली नाही. ड्रोनला पैसे जमा करण्यासाठी तो एका ठिकाणी स्वच्छता करायचा. त्याचे त्याला २० रुपये मिळायचे. ते पैसे जमा करून अनेक वैज्ञानिक आणि संशोधकांना ईमेल पाठवून ड्रोनबाबत माहिती विचारायचा. ई-वेस्ट पासून ड्रोन तयार करून आंतरराष्ट्रीय ड्रोन स्पधेर्साठी त्याने आपले ३६० किलोचे ड्रोन तयार केले. जपानला स्पर्धेला जाण्यासाठी आईने मंगळसूत्र मोडून त्याला पैसे दिले. तेथे त्याला सुवर्णपदक मिळाले.

सहीसाठी ८ दिवस उपाशी...

जपानला जाण्यासाठी प्रतापला चेन्नई येथील एका प्राध्यापकाची सही हवी होती. त्याला चेन्नईला जायला पैसेही नव्हते. तो चेन्नईला गेला. पण त्याला पाहून प्राध्यापकने सही दिली नाही. पण तो तेथेच थांबला. पैसे नसल्याने आठवडाभर उपाशी राहिला होता. ३६ दिवसांनंतर त्याला संबंधित प्राध्यापकाने सही दिली.

ड्रोन वाचवतो माणसांचे प्राण

आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारे ड्रोन तयार केले आहेत. नुकताच कर्नाटकमध्ये पूर आला होता. तेव्हा कर्नाटक सरकारने माझ्या ड्रोनचा वापर केला. पूरग्रस्त लोकांना अन्न, औषध पोहोचविण्याचे काम या ड्रोनने केले. ड्रोनच्या मदतीने हजारो लोकांचे प्राण वाचले आहेत.- प्रताप एन. एम., सीईओ, एरोव्हेल स्पेस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी

टॅग्स :technologyतंत्रज्ञानPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र