मुख्य सभेपुढे आज अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:52 IST2016-02-29T00:52:28+5:302016-02-29T00:52:28+5:30
महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीकडून तयार करण्यात आलेले २०१६-१७ या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यसभेसमोर मांडणार आहेत.

मुख्य सभेपुढे आज अंदाजपत्रक
पुणे : महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या स्थायी समितीकडून तयार करण्यात आलेले २०१६-१७ या वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यसभेसमोर मांडणार आहेत.
आयुक्त कुणाल कुमार यांनी मांडलेल्या ५ हजार कोटींच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीकडून आणखी वाढ केली जाणार का याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. कुणाल कुमार यांनी मागील वर्षीच्या तुलनेत १२०० कोटी रूपयांची वाढ असलेले २०१६-१७ सालचे ५ हजार १९९ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडले आहे.
कुणाल कुमार हे परदेश दौऱ्यावर असल्याने यंदा प्रथमच आयुक्तांच्या अनुपस्थितीमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षांकडून अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये चालू वर्षीच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेऊन आगामी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर दरवर्षीच्या परंपरेनुसार अंदाजपत्रक बनविण्याचे सर्वाधिकार स्थायी समितीच्या अध्यक्षांना दिले होते. (प्रतिनिधी)