शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

बीएसएनएलची सेवा बंद; बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 02:34 IST

आदिवासी बांधवांची उपेक्षा; बँकेतील हक्काचे पैसेही नागरिकांना काढता येत नाहीत

तळेघर : आयटी हब म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पुणे शहरापासून साधारण शंभर-सव्वाशे किमीवर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातीलच तळेघरचा (आंबेगाव) विकास मात्र केवळ मोबाईलची रेंज आणि टेलिफोन लाईन व्यवस्थित नाही म्हणून झालाच नाही. केवळ बीएसएनएलचीच मोबाईल सेवेच्या टप्प्यात असणारे तळेघरमधील नागरिक बीएसएनएलच्या ढिसाळ कारभारामुळे कायम नॉट रिचेबल असतात. मात्र, गेल्या एक महिन्यापासून तर दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्यामुळे आता बँकेचा कारभारही ठप्प झाला असून, आॅनलाइन बँकिंगचा टेंभा मिरविणाऱ्या बँकांना तळेघरमध्ये आॅफलाइन कारभार करणेही शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या खात्यावरील हक्काचे पैसेही काढता येत नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभा, शिनोली, अडिवरे, ही गावे शैक्षणिक, राजकीय, व्यापार, उद्योग, बँक या दृष्टीने केंद्र बिंदू बनले आहे. या गावांचा आदिवासी भागातिल ५० ते ६० गावांशी संपर्क जोडला आहे. काही वर्षापूर्वी या आदिवासी भागामध्ये आदिवासी जनतेचा संपर्क इतरत्र व्हावा यासाठी या गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचा मनोरे उभारण्यात आले. यामुळे या भागातील आदिवासी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला. एकमेव मोबाईल सेवा असल्यामुळे बीएसएनएल कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. त्याच प्रमाणे भीमाशंकर पाटण आहुपे खोºयातील आदिवासी जनतेचा आर्थिक प्रश्न कायमचा मिटावा या साठी तळेघर अडिवरे डिंभा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा काढण्यात आल्या या नंतर या बँका बीएसएनएल कंपनीच्या मनोºयाशी आॅनलाइन जोडण्यात आल्या. त्यामुळे बँकाचे व्यवहार आॅनलाइन झाले. मात्र आत बहुतांशवेळा गावात रेंज नसल्यामुले बँकेचे अधिकारी बँकेचे व्यवहारही बंद ठेवतात. गावात जिल्हा मध्यवर्ती बँक एकच असल्यामुळे मोठ्या बँकेचे व्यवहार करण्यासाठी, पैसे काढण्या व भ रण्यासाठी सुमारे साठ ते सत्तर किमी अंतरावरून पायी चालत आलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागते.बीएसएनएल कंपनीच्या या ढिसाळ कारभारात लवकरात लवकर सुधारणा व्हावी अन्यथा घोडेगाव येथील तहसिल कार्यालय व मंचर येथील बीएसएनएल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवराम कोकाटे मारुती केंगले तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले माजी सरपंच सखाराम मोहंडुळे तुळशिराम इष्टे आदिवासी सोसायटीचे सचिव तुकाराम मोरमारे राजपुरचे पोलिस पाटील उत्तम वाघमारे शंकर मोहंडुळे मारुती इष्टे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.किरकोळ कारणांमुळे बीएसएनएलची रेंज होते खंडितकेबल तुटणे, लाईट नसणे, मनोरा नादुरुस्त होणे तर कधी किरकोळ बिघाड, यामुळे दूरध्वनी सेवा विस्कळीत होणे अशा समस्या निर्माण होतात. परंतु बीएसएनएल कंपनीचे अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कधीतर चक्क डिझेल नाही त्यामुळे इंजिन बंद आहे, तर कधी लाईटची समस्या. अशा किरकोळ कारणांमुळे बीएसएनएलची रेंज खंडित होते. त्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.टॉवर चालू राहण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र वीजबिल भरले नसल्याने टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे वीजबिलासाठी वरिष्ठ कार्यालयातून निधी आल्यानंंतर वीजपुरवठा चालू होईल व सेवा पूर्ववत होईल.वरिष्ठ अधिकारी, बीएसएनएल

टॅग्स :BSNLबीएसएनएल